In Pics : कडाक्याच्या थंडीमुळे काश्मीरमधील 'दल सरोवर गोठलं',तापमानानं तोडला गेल्या 30 वर्षाचा रेकॉर्ड
काश्मीर खोऱ्यात इतर ठिकाणीही थंडीच प्रमाण वाढलं आहे.
श्रीनगरमधील तापमान उणे 8 अंशांपर्यंत पोहोचले आहे.
शहरात आणि काश्मीर खोऱ्यात इतरत्र अनेक ठिकाणी रस्त्यावर बर्फाचा थर जमा झाला आहे
रात्री देखील श्रीनगरमधील तापमान उणे 8.4 होते.
पाण्यातून बोटी बाहेर काढताना येथील नावाड्यांना कसरत करावी लागत आहे.
तलावात विहार करणाऱ्या बोटींना ती बोट पुढे नेण्यासाठी चक्क बर्फ फोडावा लागत आहे.
येथील शिकारा या बोटींमुळे आणि निसर्गसौंदर्यामुळे या सरोवराला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे श्रीनगरमधील दल सरोवर गोठला आहे.
पाणी गोठल्याने येथील नागरिकांचे जगणे काहीसे अवघड झाल्याचे चित्र आहे.
हाड गोठवणारी थंडी पडल्यामुळे दल सरोवरसह अनेक भागातील पाण्याचे क्षेत्र गोठले आहे.
काश्मिरच्या सौंदर्यातील महत्त्वाचा भाग असून हा सरोवर पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात.
गेल्या 30 वर्षातील हे तापमान सर्वात कमी तापमान असल्याची माहिती समोर आली आहे.