Malaika Arora ची लव्ह लाईफ | एकेकाळी अरबाज खानची पत्नी, आता अर्जुन कपूरची गर्लफ्रेंड
अर्जुन आणि मलायका लग्न कधी करणार हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण सध्यातरी बॉलिवूडमधल्या पॉप्युलर जोडीपैकी ही एक जोडी आहे.
दोघांच्या नात्याला आता जवळपास तीन वर्षे झाली आहे. यादरम्यान त्यांचे अनेक फोटो पाहायला मिळतात.
मलायकाच्या प्रेमात पडण्याआधी अर्जुन कपूर हा अरबाजची बहिण अर्पितासोबत रिलेशनशिपमध्ये होता. तिच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर मलायकासोबत त्याचं अफेअर सुरु झालं.
अरबाजसोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अर्जुन कपूरच्या प्रेमात पडली. अर्जुन कपूर वयाने तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे.
2017 मध्ये अरबाज-मलायकाने घटस्फोट घेऊन आपलं नातं संपवलं. वैवाहिक आयुष्यात काही गोष्टी जुळत नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.
दोघांनी ख्रिश्चन आणि मग मुस्लीम रितीनुसार लग्न केलं. यानंतर काही वर्षांनी ते अरहानचे आई-बाबा बनले.
एका मुलाखतीत मलायकाने सांगितलं होतं की, लग्न करण्याचा निर्णय तिनेच घेतला होता.
पाच वर्षे गर्लफ्रेण्ड-बॉयफ्रेण्डच्या नात्यात राहिल्यानंतर अखेर 1998 मध्ये ती वेळ आली जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
कॉफी अॅडमध्ये काम केल्यानंतर दोघांची मनं जुळली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. जवळपास पाच वर्षे ते दोघे डेट करत होते.
मलायका आणि तिचा घटस्फोटित पती अरबाज खान यांची लव्हस्टोरीही फार इंटरेस्टिंग आहे. हे दोघांची पहिली भेट एका कॉफी अॅडच्या शूटिंगदरम्यान झाली होती.
काही जण एव्हरग्रीन असतात. अभिनेत्री मलायका अरोरा त्यापैकीच एक. मलायका तिच्या फिटनेस आणि लव्ह लाईफमुळे कायम चर्चेत असते. एकेकाळी अरबाज खानची पत्नी असलेली मलायका आता अभिनेता अर्जुन कपूरची गर्लफ्रेण्ड आहे.