PHOTO | चार वर्षाच्या चिमुकल्याने सर केलं कळसूबाई शिखर
धनुषला कळसूबाई शिखर सर करायला साधारण 3 तास 50 मिनिटे कालावधी व शिखरावरून खाली उतरण्यासाठी 2 तास 35 मिनिटे एवढा कालावधी लागला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकळसुबाई शिखरावर आलेल्या इतर ट्रेकर्सनेही धनुषचे भरभरून कौतुक केले आणि त्याला सोबत घेऊन व्हिडिओ, फोटो शूट केले.
कळसूबाई शिखरही धनुषने कोणाचीही मदत न घेता सर केलं. धनुषचा उत्साह पाहण्यासारखा होता, असं त्याचे वडील सांगतात.
अशेरी गडावरही धनुष कुणाचीही मदत न घेता हळूहळू ट्रेकिंग करत होता.
त्यानंतर धनुषचे वडील शिखरांवर आणि गडांवर ट्रेकिंगसाठी जायचे आणि घरी परतल्यावर त्यांनी काढलेले व्हिडिओज, फोटो धनुष पाहायचा. याच माध्यमातून त्याला ट्रेकिंगची आवड निर्माण झाली.
साधारण एक वर्ष आधी धनुष आपल्या वडिलांच्या सोबत डहाणूच्या महालक्ष्मी गडावर गेला होता आणि तो कुणाच्याही मदतीविना ह्या गडावर चढला होता.
पालघर जिल्ह्यातील डहाणूमधील धनुष या चार वर्षाच्या चिमुकल्याने महाराष्ट्रातील उंच कळसुबाई शिखर सर केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -