PHOTO : 'हिंदकेसरी' काळाच्या पडद्याआड, श्रीपती खंचनाळेंनी राज्यासह देशाचा गौरव वाढवला
पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे यांचं निधन झालं आहे. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते.
त्यांनी महाराष्ट्र केसरी, ऑल इंडिया चॅम्पियनसारख्या अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या.
हिंदकेसरी जिंकत कुस्ती क्षेत्रातील मानाचा पुरस्कार मिळवत महाराष्ट्राची मान त्यांनी उंचावली होती.
खंचनाळे यांचं राज्यातील अनेक मल्ल घडवण्यात मोठं योगदान आहे. त्यांच्या निधनाने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
खंचनाळे यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
देशातला पहिला हिंदकेसरी किताब पटकावून त्यांनी महाराष्ट्राचा आणि कुस्तीचा गौरव उंचावणारी कामगिरी केली.
ते आयुष्यभर कुस्तीत येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहीले. अनेक हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीत नाव कमावलेल्या पैलवानांचे ते वस्ताद ठरले.
काळानुसार या खेळातील बदलांकडेही त्यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -