राजधानीत शेतकऱ्यांचा एल्गार! पाहा कसा वाढतोय पाठींबा
रश्मी पुराणिक, एबीपी माझा | 07 Dec 2020 04:55 PM (IST)
1
नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे.
2
आंदोलनासाठी ट्रकचं रुपांतर राहत्या घरात केलं आहे.
3
ठिकठिकाणी तरुण असे बोर्ड घेऊन जात आहेत.
4
शेतकरी आंदोलनात हरियाणा येथील युवा सहभागी होत आहेत. लंगर, औषध पुरवणे जे जमेल ते काम हे युवक करत आहेत.
5
एक हात गमावला आहे, तरी एक हाताने झाडूने साफ सफाई करत आहे.
6
काही सोशल मीडिया माध्यमातून देखील शेतकरी आंदोलनातील माहिती देत आहेत.
7
गेल्या 12 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही.
8
9 डिसेंबरला शेतकरी आणि सरकार यांच्यात आणखी एक बैठक होणार आहे.
9
आंदोलनात सहभागी लोकांना अन्न, वस्त्र देऊन मदत केली जात आहे.
10
त्याअगोदर शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. दरम्यान, या आंदोलनाला दिवसेंदिवस पाठींबा वाढत आहे.