Sridevi Death Anniversary | करोडोंमध्ये मानधन मिळवणारी पहिली अभिनेत्री 'श्रीदेवी'
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appबॉलीवूडची पहिली लेडी सुपरस्टार म्हणून ओळख असणारी श्रीदेवी हिची आज, 24 फेब्रुवारीला तिसरी पुण्यतिथी आहे. आपलं सौंदर्य आणि अदाकारी अभिनयाने तिने इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आणि असं शिखर गाठलं जिथे पोहोचणं इतकं सहज नव्हतं.
श्रीदेवीने वयाच्या चौथ्या वर्षीच आपल्या अभिनयाच्या करिअरला सुरुवात केली. अनेक साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं.
श्रीदेवीने आपल्या 51 वर्षांच्या चित्रपटाच्या करिअरमध्ये तब्बल 300 चित्रपटात काम केलं. बालकलाकार म्हणून श्रीदेवीचा जूली हा पहिला चित्रपट होता, तर तिचा शेवटचा चित्रपट मॉममधील भूमिकेसाठी श्रीदेवीला उत्कृष्ट अभिनेत्रीचा मरणोत्तर पुरस्कार दिला गेला.
श्रीदेवीच्या मृत्यूनंतर त्यांचा झिरो या चित्रपटातील कॅमिओ सर्वांना पाहायला मिळाला.
श्रीदेवी अशी पहिली अभिनेत्री होती जिला तब्बल एक करोड रुपये मानधन दिलं गेलं. 80 ते 90 च्या दशकात श्रीदेवीला एक संघर्षमयी आणि सफल अभिनेत्री म्हणून मानलं जायचं. त्याकाळात श्रीदेवीला ती सांगेल ती रक्कम देण्यास तयार असत.
श्रीदेवीच्या सौंदर्यावर बोनी कपूर इतके प्रभावित झाले की तिला भेटण्यासाठी ते थेट त्यांच्या मिस्टर इंडिया या चित्रपटासाठी साईन करण्यास पोहोचले.
मिस्टर इंडियासाठी श्रीदेवीने 11 लाख रुपयांची मागणी केली होती. बोनी कपूर ते अकरा लाख देण्यास ताबडतोब तयार झाले आणि श्रीदेवीने चित्रपट साईन केला.
श्रीदेवीने 1996 मध्ये सर्व इंडस्ट्रीला एक सुखद धक्का दिला, प्रोड्युसर बोनी कपूर यांच्याशी श्रीदेवीने लग्न केलं. बोनी कपूर हे त्याआधी विवाहित होते आणि त्यांना दोन मुलंदेखील होती.
मिस्टर इंडिया, चालबाज, नगीनासोबत काही चित्रपट केल्यानंतर श्रीदेवीने काही कालावधीसाठी अभिनयातून ब्रेक घेतला. त्यानंतर 15 वर्षांनंतर इंग्लिश-विंग्लिश या चित्रपटातून श्रीदेवीने जोरदार कमबॅक केलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -