जुन्या 5, 10 आणि 100 च्या नोटा बंद होणार? आरबीआयने काय म्हटलं...
नोटाबंदीनंतर 10 नोव्हेंबर 2016 रोजी 500 च्या नोटा, 5 जानेवारी 2018 रोजी 10 ची नवीन नोट जारी केली, जुलै 2019 मध्ये 100 ची नवीन नोट जारी करण्यात आली,
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 100, 10 आणि 5 च्या जुन्या नोटा संदर्भात कोणतीही अंतिम मुदत किंवा परिपत्रक जारी केलेले नाही.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे महाव्यवस्थापक बी. महेश यांच्या वक्तव्यानंतर 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या प्रवक्ते यांना स्पष्ट केलं की, पुढील मार्च आणि एप्रिलनंतरही 100, 10 आणि 5 रुपयांच्या जुन्या नोटा चलनात राहतील.
मात्र या बातमीत काहीच तथ्य नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे की, 100, 10 आणि 5 रुपयांच्या सर्व जुन्या नोटा वैध आहेत आणि त्या चलनात राहतील. त्यांना चलनातून हटवण्याची सध्या कोणतीही योजना नाही.
नोटबंदीनंतर चलनी नोटांबाबत अनेक अफवा सातत्याने पसवल्या जात आहेत. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून पुढच्या महिन्यापासून काही जुन्या नोटा जसं की 100, 10 आणि 5 रुपयांच्या नोटा चलनातून हटवणार असल्याची माहिती पसरवली जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -