In Pics : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यात पुराचा कहर, सलग तिसऱ्या दिवशी रेस्क्यू ऑपरेशन सुरु
त्या परिस्थितीत स्थानिक प्रशासनानं नागरिकांची मनं वळवली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसीखुर्द धरणाच्या सोडलेल्या पाण्याने कहर केला आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज- पिंपळगाव- बेलगाव रणमोचन- बेटाळा -खरकाडा या गावांना पुराचा जबरदस्त फटका बसला आहे.
वैनगंगा नदी वाहत असलेल्या भागांमध्ये पाऊस नसताना शेती व घरे पाण्याखाली गेल्याची विचित्र स्थिती निर्माण झाली आहे.
त्यांच्या अन्नपाण्याची व्यवस्थाही सेनादलानं केली.
सावंगीतल्या रिलीफ कॅम्पमधल्या अपुऱ्या सुविधांमुळं लोकांची घर सोडून तिथं जायची तयारी नव्हती.
लोक आपलं घर सोडायला तयार नव्हते. त्यामुळं बचावमोहिमेत दोन तास खंड पडला होता.
सकाळी पावणेदहा वाजता सुरु झालेल्या मोहिमेत 104 गावकऱ्यांचा यशस्वी रेस्क्यू करण्यात आले.
लष्कराच्या जवानांचे बचाव कार्य सलग तिसऱ्या दिवशीही सुरू होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -