Zee Marathi Awards : रेड कार्पेटवर कलाकारांचा ग्लॅमरचा जलवा, पाहा फोटो
Zee Marathi Awards : यंदाच्या रेड कार्पेटवर झी मराठीच्या जेष्ठ कलाकारांची उपस्थिती सर्वात भावनिक ठरली.
Continues below advertisement
Zee Marathi Awards
Continues below advertisement
1/11
'झी मराठी अवॉर्ड्स 2025' मुख्य सोहळ्याच रेड कार्पेट यंदाही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
2/11
सोहळ्याची सुरुवात झाली ती रेड कार्पेटवरील ग्लॅमर, उत्साह आणि जल्लोषात.
3/11
एकापेक्षा एक लाजवाब पोशाख, आणि स्टाईलिश अंदाज हे क्षण प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरणार आहेत.
4/11
‘तारिणी’, ‘पारू’, ‘कमळी’, 'सावळ्याची जणू सावली, वीण दोघांतली ही तुटेना', 'तुला जपणार आहे', 'लाखात एक आमचा दादा' आणि 'चला हवा येऊ द्या' या मालिकांतील कलाकारांनी आपापल्या अंदाजमध्ये रेड कार्पेटवर एंट्री घेतली.
5/11
तारिणी-केदार, पारू-आदित्य, हृषी-कमळी, सावली-सारंग, सिद्धू-भावना, जयंत-जान्हवी, मीरा- अथर्व, सूर्या- तुळजा, श्रीनिवास-लक्ष्मी यांचा सहज भाव, त्यांच्या नजरेतली चमक आणि चाहत्यांशी जोडलेलं हृदयस्पर्शी नातं पुन्हा एकदा अधोरेखित झालं.
Continues below advertisement
6/11
यंदाच्या रेड कार्पेटवर झी मराठीच्या जेष्ठ कलाकारांची उपस्थिती सर्वात भावनिक ठरली.
7/11
राजवडे आजी, सुरू आजी, आप्पा , गाडे पाटील आजी,अन्नपूर्णा आजी, अशा अनुभवी चेहऱ्यांनी वातावरणात एक वेगळीच गरिमा आणली.
8/11
त्यांच्यामागोमाग आलेल्या खलनायिका आणि खलनायक ‘देवमाणूस’ यांची एंट्री चाहत्यांनी जल्लोषात स्वागत केलं.
9/11
प्रत्येक कलाकाराचं रेड कार्पेटवरचं आगमन म्हणजे एक छोटा सोहळाच वाटत होता.
10/11
झी मराठी अवॉर्ड्स 2025 चा रेड कार्पेट सोहळा भावनांचा, आठवणींचा आणि प्रेमाचा उत्सव होता.
11/11
आपल्या मालिकांमधील कलाकार एकत्र दिसले, त्यांच्या हसऱ्या चेहऱ्यांनी, एकमेकांना दिलेल्या मिठ्यांनी, आणि प्रेक्षकांसोबत घालवलेल्या क्षणांनी हे स्पष्ट केलं की झी मराठीचं कुटुंब खरंच एकसंध आहे.
Published at : 03 Oct 2025 09:59 PM (IST)