Honey Singh Transformation: हनी सिंहनं फक्त एका महिन्यात कसं कमी केलं 17 किलो वजन? सीक्रेट आलं समोर
Honey Singh Transformation: यो यो हनी सिंग फक्त एका महिन्यात फॅट टू फिट झाला. त्यानं तब्बल 17 किलो वजन कमी केलं. हनी सिंगनं कोणता डाएट प्लॅन, वर्कआउट फॉलो केलं, असा प्रश्न साऱ्यांनाच पडला आहे.

Honey Singh Transformation
1/11
रॅपर आणि संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध कलाकार हनी सिंहनं त्याच्या जबरदस्त ट्रांसफॉर्मेशननं चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. एका महिन्यात त्यानं तब्बल 17 किलो वजन कमी केलं आहे. आता हनी सिंगच्या ट्रेनरनं त्याचं वजन 94 किलोवरून 77 किलोपर्यंत कसं कमी झालं, हे सांगितलं आहे.
2/11
2000 दशकाच्या उत्तरार्धात संगीत उद्योगात धुमाकूळ घालणाऱ्या भारतातील सर्वात प्रसिद्ध रॅपर्सपैकी एक, 'यो यो' हनी सिंगचा फिटनेस जर्नी फिजिकल आणि मेंटली दोन्ही दृष्टीनं एक रोलर कोस्टर राईड होती. तो सुमारे 5 वर्ष बायपोलर डिसऑर्डर नावाच्या आजाराशी झुंज देत होता.
3/11
या आजारामुळे तो साडेतीन वर्ष घराबाहेरही पडला नाही. त्याला दारूचंही व्यसन लागलं. या काळात त्याचं वजनही खूप वाढलं, पण नंतर त्यानं स्वतःला हेल्दी लाईफ जगण्यासाठी प्रेरित केलं आणि आज त्यानं फॅट टू फिट प्रवास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.
4/11
हनी सिंगनं ट्रेनर अरुण कुमारच्या गायडन्समध्ये एक बॅलन्स डाएट आणि वर्कआऊट रुटीन फॉलो केलं होतं. ज्यामुळे त्याचं वजन कमी झालं होतं.
5/11
अलीकडेच, आज तकला दिलेल्या मुलाखतीत, हनी सिंगच्या ट्रेनरनं सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी रॅपरनं कोणतं डाएट आणि वर्कआउट प्लान फॉलो केलं. हनी सिंगच्या आहारात एक खास ग्रीन ज्यूस असल्याचं ट्रेनरनं सांगितलं. या पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या ज्यूसनं त्याचं शरीर डिटॉक्सीफाई करण्यास आणि मेटाबॉलिज्म वाढविण्यास मदत केली.
6/11
ट्रेनरनं हनी सिंगच्या या ज्यूसची रेसिपीही सांगितली. त्यानं सांगितलं की, बीटरूटमध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि ते रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतं. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं जे पचनक्रिया सुधारण्यास आणि चरबी कमी करण्यास मदत करतं. काकडी शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते आणि विषारी पदार्थ शरीरातून काढून टाकते. गाजर पचनक्रिया चांगली करण्यास मदत करतात तसेच शरीराला महत्त्वाचं जीवनसत्त्वे प्रदान करतात. कोथिंबीरची पानं पचन आणि चयापचय सुधारतात.
7/11
त्यांनं सांगितलं की, हा ग्रीन ज्यूस सकाळी लवकर अनोशापोटी घ्यावा जेणेकरून शरीर सर्व पोषक तत्व सहजपणे शोषून घेईल.
8/11
ट्रेनरनं सांगितलं की, एका महिन्यात 17 किलो वजन कमी करण्यासाठी शिस्त आवश्यक आहे आणि हनी सिंगच्या डाएटनं त्याच्या ट्रांसफॉर्मेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. त्याच्या सकाळच्या जेवणात ग्रीन ज्यूस, ब्लेंडेड वेजिटेबल्स आणि फायबरचा समावेश होता.
9/11
हनी सिंह लंचमध्ये प्रोटीन आणि कार्बचा समतोल राखण्यासाठी भातासोबत उकडलेलं चिकन खायचा. ईव्हिनिंग मीलमध्ये मेटाबॉलिज्म वाढवण्यासाठी भाज्यांचं सूप किंवा उकडलेलं चिकन अॅड केलं गेलं होतं. तर डिनरमध्ये फायबर आणि व्हिटॅमिन्ससाठी हिरव्या पालेभाज्यांच्या सूपचा समावेश होता.
10/11
वजन कमी करताना, हनी सिंगनं प्रोसेस्ड फूड,, साखर आणि अल्कोहोल टाळलं आणि आहाकात फक्त नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश केला. वजन कमी करण्यासाठी हनी सिंगनं केवळ डाएटच नाही तर तीव्र कसरत देखील केली. त्यानं स्नायू वाढवण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं, तर कॅलरीज बर्न करण्यासाठी त्यानं कार्डिओ सेशन घेतलं. त्यानं 20-25 हाय रिप ट्रेनिंग केले. सकाळी लवकर असो किंवा रात्री उशिरा, तो कधीही त्याचा वर्कआऊट सेशन चुकवत नव्हता.
11/11
वजन कमी करण्यासाठी सप्लिमेंट्स घेण्याऐवजी, हनी सिंगनं नॅचुरल फूडवर लक्ष केंद्रीत केलं. त्याच्या आहारात दररोज 60 ग्रॅम प्रथिने होती.
Published at : 06 Mar 2025 10:00 AM (IST)