Munmun Dutta : तारक मेहता का उल्टा चष्मा शोमधील 'बबिता' सोडणार मालिका?

Continues below advertisement

(photo:/mmoonstar/ig)

Continues below advertisement
1/7
Munmun Dutta : तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) हा शो सध्या त्यामधील कलाकारांमुळे चर्चेत आहे. (photo:/mmoonstar/ig)
2/7
गेली कित्येक वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. या मालिकेच्या कथानकाला आणि मालिकेमधील कलाकारांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. पण काही दिवसांपूर्वी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमधील अभिनेते शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला, अशी चर्चा सुरू होती. आता लवकरच मुनमुन दत्ता (Munmun Dutta) देखील ही मालिका सोडणार असल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. (photo:/mmoonstar/ig)
3/7
'तारक मेहता का उल्टा चष्मा ' या मालिकेमध्ये बबिता ही भूमिका मुनमुन साकारते. या भूमिकेमुळे मुनमुनला विशेष लोकप्रियता मिळाली. पण रिपोर्टनुसार, मुनमुन ही मालिका लवकरच सोडणार आहे.(photo:/mmoonstar/ig)
4/7
रिपोर्टनुसार, मुनमुनला बिग बॉसच्या नव्या सिझनची ऑफर देण्यात आली आहे. जर मुनमुननं बिग बॉस या कार्यक्रमाची ऑफिर स्विकारली तर ती तारक मेहता का उल्टा चष्मा ही मालिका सोडायचा निर्णय घेऊ शकते. मुनमुननं अजून याबाबत कोणतीही माहिती तिच्या चाहत्यांना दिलेली नाही. (photo:/mmoonstar/ig)
5/7
मुनमुन दत्ता ही बिग बॉसच्या 15 व्या सिझनमध्ये सहभागी झाली होती. ती केवळ दोन दिवसच या शोमध्ये सामिल झाली.(photo:/mmoonstar/ig)
Continues below advertisement
6/7
तिच्यासोबत अभिनेत्री सुरभि चंदना, आकांक्षा पुरी आणि विशाल पुरी यांनी देखील या शोमध्ये हजेरी लावली होती. या सर्व सदस्यांनी घरामधील इतर सदस्यांना काही अवघड टास्क करायला सांगितले होते. केवळ दोन दिवस बिग बॉसमध्ये सहभागी झालेल्या मुनमुननं त्यावेळी प्रेक्षकांची मनं जिंकली होती.(photo:/mmoonstar/ig)
7/7
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. तसेच या मालिकेमधील कलाकारांची विनोदी शैली नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.(photo:/mmoonstar/ig)
Sponsored Links by Taboola