Tunisha Sharma : वय वर्ष अवघं 20; मिलियन्समध्ये फॉलोअर्स, 'थांबायचं नाय' म्हणत टुनिशानं सेटवरच आयुष्य संपवलं
अभिनेत्री टुनिशा शर्माने आत्महत्या केलीय. एका मालिकेचे शुटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्ये गळफास घेऊन टुनिशाने जीवन संपवलंय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनायगाव येथील स्टुडिओतील सेटवर ही घटना घडली आहे. सेटवर मेकअप करत असतानाची स्टोरी टुनिशाने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ही स्टोरी आत्महत्येच्या काही वेळ आधी टुनिशाने शेअर केली होती.
टुनिशा सध्या सब टीव्हीच्या दास्तान-ए-काबूल या शोमध्ये मुख्य भूमिकेत काम करत होती. याच मालिकेचं शूटिंग सुरू असताना सेटवरील मेकअप रूममध्येच तिने गळफास घेतला.
घटनेनंतर तात्काळ तिला रूग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. टुनिशाने एवढं टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आली नाही. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.
वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी तिनं मालिका आणि सिनेमा विश्वात मोठं नाव कमावलं होतं. तिनं हिंदी मालिकांसह काही सिनेमांमध्ये देखील काम केलं होतं.
तिनं आज मालिकेच्या सेटवर मेकअप करतानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामच्या स्टोरीला टाकला आहे. शिवाय एक फोटो पोस्ट केला असून त्यात 'काही झालं तरी थांबायचं नाही' असं लिहिलं आहे.टुनिशा शर्माचा जन्म 4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती.
टुनिशा शर्माचा जन्म 4 जानेवारी 2002 रोजी चंदीगडमध्ये झाला होता. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती.
अवघ्या 14 व्या वर्षी तिची भारत का वीर पुत्र - महाराणा प्रताप या मालिकेसाठी निवड झाली होती. या मालिकेत तिने राजकुमारी चंद कंवरची भूमिका केली होती.
टुनिशाने पाच वर्षापूर्वी आलेल्या 'फितूर' चित्रपटात छोट्या कतरिनाची भूमिका साकारली होती.
कमी वयात इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण केलेल्या टुनिशाने असे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.