विजय थलापतीच्या आयुष्यातील 'ती' कोण? प्रसिद्धी अभिनेत्री चाळीशीतही दिसते ग्लॅमरस; पाहा PHOTOs
Trisha Krishnan stylish looks: विजय थलापतीच्या पत्नीनं घटस्फोटासाठी अर्ज केल्यापासून, विजय आणि तृषा कृष्णनची प्रचंड चर्चा होत आहे.

Trisha Krishnan trends online because of Vijay thalapathy
1/8
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्री तृषा कृष्णन सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत आहे. तिच्यामुळे विजय थलापतीच्या संसारात वादळ आल्याचं बोललं जात आहे. अलिकडेच तृषा आणि विजय एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये एकत्र दिसले. यामुळे ती प्रचंड ट्रोल होत आहे.
2/8
अभिनेत्री तृषा कृष्णनने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. अभिनय कौशल्यासोबतच तिच्या सौंदर्यासाठीही ती ओळखली जाते. तिचे अनेक फोटो सोशल मीडियात व्हायरल होतात. तिचे लूक आणि स्टाईल चाहत्यांकडून फॉलो केली जाते.
3/8
तृषा कृष्णन ही दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं तिच्या कारकिर्दीत उत्कृष्ट चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
4/8
अभिनयासोबत तृषा लूक आणि स्टाईलसाठीही चर्चेत असते. गेल्या अनेक वर्षांपासून तृषा या सिनेसृष्टीत काम करत आहे. 42 व्या वर्षातही अभिनेत्री तितकीच ग्लॅमरस दिसते.
5/8
चाळीशी पार केली तरीही ही अभिनेत्री तितकीच फिट आणि सुदंर दिसते. तिच्या फिटनेस पुढे अनेक बॉलिवूड अभिनेत्री फिके पडतात.
6/8
अभिनेत्री प्रत्येक लूकमध्ये सुंदर दिसते. तिचे लूक चाहत्यांना प्रचंड आवडतात.
7/8
तृषा सोशल मीडियात सक्रीय असते. ती आपल्या चाहत्यांसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.
8/8
वेस्टर्न असो किंवा पारंपारिक. प्रत्येक लूक तिच्यावर उठून दिसतो. साडी लूकवरील तिचा कातिलाना अंदाज पाहून चाहते घायाळ होतात.
Published at : 06 Mar 2026 04:39 PM (IST)