Trisha Krishnan Meets Vijay Thalapathy Sister and Mother: शपथविधी सोहळ्यात येताच तृषा कृष्णनची विजयच्या बहिणीला घट्ट मिठी, आईलाही आलिंगन; Photos व्हायरल
स्टेडियमबाहेरील वातावरण उत्साह, कुतूहल आणि थोड्याशा जुन्या आठवणींच्या मिश्रणाने भारलेले आहे.
Continues below advertisement

Trisha Krushnan
Continues below advertisement
1/12
पाच दिवसांच्या नाट्यमय घडामोडींनंतर आज तमिळनाडूत शपथविधी पार पडला आहे. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
2/12
या शपथविधी सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक, नेते, उपस्थित होते, विजय यांनी शपथ घेताना जमलेल्या जनतेने टाळ्या शिट्या वाजवून एकच उत्साह व्यक्त केला.
3/12
विजय हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना त्यांचे आई वडील भावूक झाल्याचे दिसून आले.
4/12
चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात राजकीय नेत्यांसह सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.
5/12
. मात्र, सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते अभिनेत्री तृषा कृष्णनने.
Continues below advertisement
6/12
शपथविधी सोहळ्यासाठी पोहोचलेल्या तृषाने स्टेडियममध्ये प्रवेश करताच विजय यांच्या बहिणीला घट्ट मिठी मारली.
7/12
यावेळी तृषाच्या चेहऱ्यावरचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता.
8/12
तिने विजय यांच्या आईचीही खास भेट घेतली.
9/12
दोघींना पाहताच तृषाने अगदी आपुलकीने मिठी मारली आणि काही क्षण संवादही साधला. हा भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद होताच सोशल मीडियावर व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला.
10/12
गेल्या काही दिवसांपासून विजय आणि तृषाच्या नात्याबाबत सोशल मीडियावर विविध चर्चा सुरू होत्या.
11/12
अशातच विजयच्या कुटुंबीयांशी तृषाने दाखवलेली जवळीक पाहून नेटकऱ्यांमध्ये पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे.
12/12
विजयच्या शपथविधी सोहळ्यासाठी कार्यक्रमस्थळी पोहोचताना तिने अत्यंत साधेपणा आणि तरीही आपुलकीचा भाव कायम राखला होता.
Published at : 10 May 2026 11:30 AM (IST)