एक्स्प्लोर
130 कोटींचं बजेट अन् कमाई 800 कोटी पार, थिएटर्सनंतर आता OTT वर 'छावा'चं तुफान; सर्वांना पछाडून ठरला नंबर 1
Chhaava On OTT: 2025 मध्ये ब्लॉकबस्टर छावा प्रदर्शित झाला, जो केवळ देशातच नाही तर जगभरात हिट झाला. छावानं बॉक्स ऑफिसवर 800 कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय, आता छावा ओटीटी प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालतोय.
Top Trending Film On OTT
1/11

ओटीटीवरची टॉप 10 ट्रेडिंग लिस्ट पुन्हा एकदा बदलली आहे. यावेळी, 2025 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटानं ओटीटीची शर्यत जिंकली आहे आणि पहिलं स्थान पटकावलं आहे. चित्रपट प्रदर्शित होऊन जवळजवळ दोन महिने झाले, पण त्याची क्रेझ अजूनही शिगेला पोहोचली आहे. आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव 'छावा' आहे.
2/11

'छावा' रिलीज झाला आणि त्यानं कित्येक दिवस बॉक्स ऑफिसवर गटांगळ्या खाणाऱ्या बॉलिवूडला नवसंजीवनी दिली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 2025 चा सर्वात मोठा ओपनर म्हणून 'छावा'नं बहुमान मिळवला.
3/11

छत्रपती शिवाजी महाराजांचे थोरले पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित 'छावा' चित्रपटानं बॉक्स ऑफिस गाजवलंच, पण प्रेक्षकांच्या मनातही मानाचं स्थान मिळवलं. बॉक्स ऑफिस गाजवणारा 'छावा' 14 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.
4/11

'छावा'मध्ये विक्की कौशलनं मुख्य भूमिका साकारली. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत विक्की कौशलनं उत्कृष्ट कामगिरी केली आणि त्याच्या दमदार अभिनयाचं खूप कौतुकही झालं. या चित्रपटात त्याच्यासोबत रश्मिका मंदाना देखील दिसली होती.
5/11

'छावा' चित्रपटाची कथा मुघल सम्राट औरंगजेबाला काँटे की टक्कर देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित होती. या चित्रपटात औरंगजेबाची भूमिका साकारून अक्षय खन्नानं प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानं रुपेरी पडद्यावर साकारलेला क्रूरकर्मा शक्तिशाली खलनायकीपणा चर्चेत राहिला.
6/11

विक्की कौशल आणि अक्षय खन्ना यांचा 'छावा' चित्रपट 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. हा चित्रपट दोन्ही स्टार्सच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही ठरला. आशुतोष राणा, विनीत कुमार सिंह, दिव्या दत्ता, प्रदीप सिंग रावत, डायना पेंटी यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसले.
7/11

'छावा' हा चित्रपट 11 एप्रिल रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला. नेटफ्लिक्सवर येताच हा चित्रपट भारतातील टॉप 10 यादीत आला, हे आश्चर्यकारक आहे. विक्की कौशलचा हा चित्रपट देशात पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे. 'कोर्ट' दुसऱ्या स्थानावर, 'टेस्ट' तिसऱ्या स्थानावर, 'पेरुसु' चौथ्या स्थानावर आणि 'देवा' पाचव्या स्थानावर आहे.
8/11

आता 'छावा' चित्रपटाच्या बजेट आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल बोलायचं झालं तर, आयएमडीबीच्या अहवालानुसार, विक्की कौशलचा हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. 'छावा' साकारण्यासाठी तब्बल 140 कोटींचा खर्च करण्यात आलेला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट थिएटरमध्ये हिट झाला आणि जगभरातील कमाईच्या पाचपट जास्त कमाई करून या चित्रपटानं इतिहास रचला.
9/11

'छावा'नं भारतात 599.95 कोटींचा व्यवसाय केला. चित्रपटाची एकूण जगभरातील कमाई 801.90 कोटी रुपये आहे. जर तुम्ही हा चित्रपट अजून थिएटरमध्ये पाहिला नसेल, तर आता तुम्ही नेटफ्लिक्सवर घरी बसून आरामात या सिनेमाचा आनंद घेऊ शकता.
10/11

विक्की कौशलचा 'छावा' हा चित्रपट लक्ष्मण उतेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट मॅडॉक फिल्म्सच्या बॅनरखाली बनवण्यात आला आहे. 'छावा' हा 2025 मध्ये देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटी रुपये कमावणारा पहिला चित्रपट आहे.
11/11

यापूर्वी 'पुष्पा 2' (हिंदी), 'जवान', 'स्त्री 2', 'गदर 2', 'पठाण', 'बाहुबली 2' (हिंदी) आणि रणबीर कपूरचा 'अॅनिमल' यांसारखे चित्रपट भारतातील 500 कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाले आहेत.
Published at : 15 Apr 2025 06:42 AM (IST)
View More
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्रीडा
व्यापार-उद्योग
भारत


















