फक्त 10 कोटींचं बजेट पण कमाई धुवांधार, BLOCKBUSTER फिल्म थिएटरनंतर OTT वर गरजली; नंबर 1 वर करतेय ट्रेंड
Top Trending Film On OTT: 2025 मध्ये, एका कमी बजेटच्या चित्रपटानं भरघोस कमाई केलीय. हा चित्रपट कोणताही गाजावाज न करता गुपचूप प्रदर्शित झाला आणि नंतर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली.

Top Trending Film On OTT Court State Vs A Nobody
1/13
Top Trending Film On OTT: 2025 मध्ये, एका कमी बजेटच्या चित्रपटानं भरघोस कमाई केलीय. हा चित्रपट कोणताही गाजावाज न करता गुपचूप प्रदर्शित झाला आणि नंतर या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खळबळ माजवली.
2/13
खर्चापेक्षा 5 पट जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटानं आता ओटीटीवर कब्जा केला आहे आणि हा सिनेमा देशातील नंबर 1 चित्रपट बनला आहे.
3/13
कमी बजेटच्या या चित्रपटानं ओटीटीवर धुमाकूळ घातला आहे. अतिशय कमी खर्चात बनवलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली. चित्रपटाची दमदार कहाणी लोकांच्या मनाला भिडली.
4/13
आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव आहे, 'कोर्ट-स्टेट वर्सेस ए नोबडी'.
5/13
'कोर्ट-स्टेट वर्सेस ए नोबडी' हा तेलुगू भाषेत बनलेला कोर्टरूम ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट यावर्षी होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला.
6/13
प्रियदर्शी पुलिकोंडा या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसून आला आहे. हर्ष रोशन आणि श्रीदेवी हे देखील चित्रपटाचा एक भाग आहेत. अतिशय कमी खर्चात बनवलेला हा चित्रपट खूप यशस्वी झाला.
7/13
या चित्रपटाची कथा चंदू नावाच्या एका पात्राभोवती फिरते, जो एका अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा आहे. तो एका श्रीमंत कुटुंबातील मुलगी जबिलीच्या प्रेमात पडतो. दोघेही सुरुवातीला फोनवर बोलतात आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात.
8/13
जेव्हा जबिलीच्या काकांना या नात्याबद्दल कळतं तेव्हा ते चंदूचं आयुष्य उध्वस्त करण्याचा कट रचतात. ते त्याला खोट्या प्रकरणात अडकवतात आणि नंतर प्रकरण न्यायालयात पोहोचतं. यानंतर चित्रपटाची खरी कहाणी सुरू होते. चित्रपटाचा क्लायमॅक्स जबरदस्त आहे.
9/13
'कोर्ट-स्टेट वर्सेस ए नोबडी' हा सिनेमा एकदा पाहायला सुरुवात केल्यानंतर तुम्ही जागेवरुन उठणार नाही. नुकताच हा चित्रपट नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आलाय. देशातील टॉप 10 सिनेमांच्या यादीत या चित्रपटानं पहिलं स्थान पटकावलं आहे.
10/13
या चित्रपटाला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि म्हणूनच 'कोर्ट-स्टेट वर्सेस ए नोबडी' बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. 'कोर्ट-स्टेट वर्सेस ए नोबडी' या चित्रपटाचं बजेट जाणून कोणालाही आश्चर्य वाटेल. आयएमडीबीनं दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट फक्त 10 कोटी रुपये खर्च करुन बनवण्यात आला आहे.
11/13
या चित्रपटानं केवळ दोन दिवसांत जगभरात 15.90 कोटी रुपयांचा व्यवसाय करून संपूर्ण खर्च वसूल केला. या चित्रपटाने भारतात 40.45 कोटी रुपयांचा व्यवसाय केला तर 'कोर्ट - स्टेट व्हर्सेस ए नोबडी'नं जगभरात 57.24 कोटी रुपये कमाई करून इतिहास रचला.
12/13
'कोर्ट-स्टेट वर्सेस ए नोबडी' हा चित्रपट राम जगदीश यांनी दिग्दर्शित केला आहे आणि त्यांनीच चित्रपटाची पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 8 रेटिंग देखील मिळालं आहे.
13/13
'कोर्ट-स्टेट विर्सेस ए नोबडी' हा 2025 मधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.
Published at : 17 Apr 2025 02:30 PM (IST)