Top Suspense Thriller Movies: झोप उडवणारा सस्पेंस-थ्रिलर, IMDb रेटिंग दमदार; OTT वरचे 'हे' सिनेमे पुरते भंडावून सोडतात
Top Suspense Thriller Movies: जेव्हा एखादा सिनेमा सस्पेन्स आणि थ्रिलनं भरलेला असतो, तेव्हा तो पाहण्याचा अनुभव खरोखरंच वेगळा असतो. दर काही मिनिटांनी, दिग्दर्शक आपल्याला नवनवे ट्वीस्ट देतो.

Top Suspense Thriller Movies
1/9
Top Suspense Thriller Movies: जेव्हा एखादा सिनेमा सस्पेन्स आणि थ्रिलनं भरलेला असतो, तेव्हा तो पाहण्याचा अनुभव खरोखरंच वेगळा असतो. दर काही मिनिटांनी, दिग्दर्शक आपल्याला नवनवे ट्वीस्ट देतो, ज्यामुळे सिनेमाबद्दलची आपली उत्सुकता वाढते.
2/9
भारतीय सिनेसृष्टीनं गेल्या काही वर्षांत आपल्याला अनेक उत्कृष्ट सस्पेन्स-थ्रिलर्स दिलेत, असे सिनेमे ज्यांनी प्रेक्षकांना पूर्णपणे मंत्रमुग्ध करून सोडलंय. यापैकी अनेक सिनेमांची सुरुवात साऊथ सिनेसृष्टीत झाली आणि नंतर त्याचं हिंदीमध्ये रिमेक बनवण्यात आलं.
3/9
सध्या, सोनीलिव्ह (SonyLIV) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही उत्कृष्ट सस्पेन्स-थ्रिलर्स उपलब्ध आहेत, ज्यांची कथा तुम्हाला सिनेमा संपता संपता थक्क करून सोडेल.
4/9
आम्ही तुम्हाला यापैकी काही निवडक उत्कृष्ट सिनेमांबाबत सांगणार आहोत. जे पाहताना नक्कीच तुमच्या पायाखालची जमीन सरकेल...
5/9
साई पल्लवी हिची 'गार्गी' ही तमिळ लीगल-ड्रामा फिल्म 2022 मध्ये प्रदर्शित झालेली. एका शाळेतील शिक्षिकेची ही कथा आहे, जिच्या वडिलांवर गंभीर गुन्ह्याचा आरोप केला जातो आणि त्यांना तात्काळ अटकही होते. वडिलांच्या सत्याबद्दल अनभिज्ञ असलेली गार्गी त्यांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करते. कथानकात सस्पेन्स आणि थराराची योग्य सांगड घातल्यामुळे हा सिनेमा पाहण्यासारखा आहे. IMDb वर या चित्रपटाला 8.1 इतकी चांगली रेटिंग मिळाली आहे. 'रामायण'पूर्वी साई पल्लवीचा अभिनय पाहायचा असेल, तर हा चित्रपट उत्तम पर्याय ठरू शकतो.
6/9
5 डिसेंबर 2025 रोजी आदित्य धर यांचा 'धुरंधर' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. त्याच दिवशी अनेक चित्रपटांची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती, मात्र ममूटी यांनी त्यांच्या 'कलामकवल' हा सायकोलॉजिकल थ्रिलर प्रदर्शित केला. एका स्पेशल क्राईम ब्रांच अधिकाऱ्याची आणि एका गुन्हेगाराचा पाठलाग करणाऱ्या कथानकावर हा सिनेमा आधारित आहे. या सिनेमात ममूटी यांनी खलनायकाची भूमिका साकारली असून त्यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं आहे. या चित्रपटाला IMDb वर 7.2 रेटिंग मिळालं आहे.
7/9
दुलकर सलमान याचा 'सॅल्यूट' हा देखील दमदार सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट आहे. एका पोलीस अधिकाऱ्याची कथा यात दाखवण्यात आली आहे, जो एका खून प्रकरणात निरपराध व्यक्तीला अडकवतो. या चुकीमुळे तो निराश होऊन नोकरी सोडतो, पण काही वर्षांनी पुन्हा परत येऊन तोच केस सोडवतो. या चित्रपटाला IMDb वर 7 रेटिंग मिळाली आहे.
8/9
'थलावन' या मलयाळम चित्रपटाची कथा दोन पोलीस अधिकाऱ्यांभोवती फिरते, ज्यांच्या अहंकारामुळे पोलीस ठाण्यात गोंधळ निर्माण होतो. मात्र एका अधिकाऱ्याच्या घरी मृतदेह सापडल्यावर कथानकाला नवा वळण मिळतो. या संघर्षाचा शेवट काय होतो, हेच चित्रपटाचं मुख्य आकर्षण आहे. या चित्रपटाला IMDb वर 7.2 रेटिंग मिळाली आहे.
9/9
2023 मध्ये, तमिळ चित्रपटसृष्टीने 'पोर थोज़िल' (Por Thozhil) नावाचा एक चित्रपट प्रदर्शित केला, ज्यानं आपल्या कथानकामुळे अनेकांना थक्क करून सोडलं. या चित्रपटाचं कथानक एका अशा खुन्याभोवती गुंफलेलं आहे, जो तिरुचिरापल्ली शहरात महिलांची निर्घृणपणे हत्या करतोय. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी दोन पोलीस अधिकारी एकत्र येतात, त्यांपैकी एक अनुभवी 'सुपरकॉप' असतो, तर दुसरा नवखा अधिकारी. हे दोघे मिळून या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा छडा लावतात, हे प्रकरण अनेक अनपेक्षित वळणांनी आणि नाट्यमय घडामोडींनी भरलेलं आहे. या सिनेमाला IMDb वर 8 इतकं रेटिंग मिळालंय.
Published at : 24 Apr 2026 07:23 AM (IST)