Tiger Shroff Akshay Kumar: टायगर श्रॉफवर हल्ला, आरोपींनी अक्षय कुमारच्या घराचीही केलेली रेकी; धक्कादायक माहिती मिळताच अभिनेत्याचं मोठं पाऊल
Tiger Shroff Akshay Kumar Attack Case: टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारनेही घेतला धसका
Continues below advertisement

Tiger Shroff Akshay Kumar Attack Case
Continues below advertisement
1/8
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर 18 ऑक्टोबर रोजी भररस्त्यावर गोळीबाराचा प्रकार घडला. या हल्ल्याची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीतील अनिल पंडीतने घेतली. त्याची कथित पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली.
2/8
दरम्यान, केवळ टायगर श्रॉफ नाही तर, इतर कलाकारांच्या घराबाहेरही आरोपींनी रेकी केली असल्याची माहिती आहे. यात बॉलिवूडमधील नामांकित सेलिब्रिटींचा समावेश आहे. माहितीनुसार, 3 बड्या अभिनेत्यांची आरोपींनी रेकी केली असल्याची माहिती आहे.
3/8
अमिताभ बच्चन, आमिर खान आणि अक्षय कुमार यांसारख्या बड्या कलाकारांची आरोपींनी माहिती काढली. या बड्या कलाकारांची सुरक्षा व्यवस्थेची आणि घराची रेकी केली अशी माहिती आहे. दरम्यान, टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ल्यानंतर अक्षय कुमारने मोठं पाऊल उचललं आहे.
4/8
अभिनेता अक्षय कुमार हा लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर आहे, अशी माहिती आहे. सध्या अक्षय कुमारच्या घरावर बुलेटप्रुफ काचा लावण्याचं काम सुरु आहे.
5/8
टायगर श्रॉफ प्रकरणाच्या संबंधित आरोपींनी अक्षय कुमारच्या घराचीही रेकी केली असल्याची माहिती, पोलीस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे अक्षय कुमारच्या घराबाहेर सध्या बुलेटप्रुफ काचा लावण्याचं काम सुरू आहे.
Continues below advertisement
6/8
मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय कुमारच्या घराबाहेरही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अनिल पंडितने सलमान खानचा उल्लेख करत त्याला पोस्टद्वारे इशारा दिला होता. सलमान खानच्या घराबाहेरही बुलेटप्रुफ काचा लावण्याचं काम सुरू आहे.
7/8
सलमान खानच्या घराबाहेर याआधीही बुलेटप्रुफ काचा लावण्यात आल्या होत्या. आता त्या काचा अपग्रेड करण्यात आल्या आहेत.
8/8
आता, या प्रकरणी दोन संशयित महिलांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या प्रकरणी आणखी कोणकोणती माहिती उघडकीस येणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
Published at : 21 Oct 2026 11:13 AM (IST)