करुणानिधींकडे एकटक पाहणारा 'तो' मुलगा, ज्यानं 40 वर्षांनी त्यांच्याच पक्षाचा सुफडा साफ केला; तामिळनाडूच्या राजकारणाचा 'तो' फोटो व्हायरल
Thalapathy Vijay Throwback Pic Share By Ram Gopal Varma: तामिळनाडूच्या राजकारणात 2026 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठा उलटफेर पाहायला मिळाला.
Continues below advertisement

Thalapathy Vijay Throwback Pic Share By Ram Gopal Varma
Continues below advertisement
1/10
Thalapathy Vijay Throwback Pic Share By Ram Gopal Varma: तामिळनाडूच्या राजकारणात 2026 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मोठा उलटफेर पाहायला मिळाला. या वर्षीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये तामिळनाडूच्या जनतेनं एका नव्या पक्षाला संधी दिली आहे, आणि हा पक्ष त्यांचा लाडका अभिनेता, खुद्द 'थलपती विजय' यांचा आहे. सिनेनिर्माते राम गोपाल वर्मा हे देखील त्यांच्या या विजयामुळे भारावून गेले आहेत.
2/10
थलपती विजय हा आता केवळ सिनेसृष्टीतच नव्हे, तर राजकारणाच्या क्षेत्रातही एक 'सुपरस्टार' म्हणून उदयास आला आहे. थलपती विजय असा एक कलाकार आहे, ज्यानं आपल्या पहिल्याच निवडणुकीच्या लढतीत विजय मिळवला आहे.
3/10
जोसेफ विजय, अर्थात थलपती विजय, यांच्या 'TVK' या पक्षाची ही पहिलीच निवडणूक होती आणि त्यांनी ती अत्यंत ऐतिहासिक पद्धतीने जिंकली आहे. 2026 च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून विजय यांच्या पक्षानं एक अभूतपूर्व कामगिरी नोंदवली आहे.
4/10
राम गोपाल वर्मा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर विजयचा दिवंगत महान राजकारणी आणि माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्यासोबतचा एक दुर्मिळ फोटो शेअर केला आहे.
5/10
प्रसिद्ध सिनेनिर्माते राम गोपाल वर्मा यांनीही या ऐतिहासिक विजयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी एक जुना (थ्रोबॅक) फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये द्रमुक (DMK) नेते आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी एका उद्घाटनाच्या कार्यक्रमात दिसत आहेत.
Continues below advertisement
6/10
तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या हस्ते उद्घाटन होतं असून ते फोटोमध्ये रिबीन कापताना दिसत आहेत.
7/10
हा फोटो शेअर करताना राम गोपाळ वर्मा यांनी लिहिलंय की, "करुणानिधींनी, अगदी आपल्या कल्पनेतील सर्वात धाडसी स्वप्नातही, असा विचार केला नसेल की, त्यांच्या मागे उभा असलेला हा लहान मुलगा एक दिवस त्यांच्या पक्षाचं अस्तित्वच संपुष्टात आणेल..."
8/10
राम गोपाल वर्मा यांची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.
9/10
गेली अनेक दशकं, तामिळनाडूतील राजकीय सत्ता DMK आणि AIADMK या पक्षांमध्ये आलटून-पालटून फिरत आली आहे. पण, आता तामिळनाडूमध्ये एका नव्या पक्षाचा उदय झाला असून जनतेनंही त्या नव्या पक्षाला संधी दिली आहे.
10/10
अगदी पहिल्यांदाच एक नवीन पक्ष, TVK... राज्याची सूत्र हाती घेण्यास सज्ज झाला आहे. थलपती विजय लवकरच तमिळनाडूचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यास पूर्णपणे सज्ज झाला आहे.
Published at : 06 May 2026 09:47 AM (IST)