Spruha Joshi: स्पृहा जोशीनं सांगितल्या बालपणीच्या आठवणी; म्हणाली...
अभिनेत्री स्पृहा जोशी ही तिच्या कवितांनी आणि अभिनयांनी प्रेक्षकांची मनं जिंकत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्पृहानं नुकतीच वायफळ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये स्पृहानं तिच्या बालपणीच्या आठवणी आणि शाळेबद्दल सांगितलं.
मुलाखतीमध्ये स्पृहानं तिच्या आई-बाबांनी दिलेल्या गिफ्टबाबत सांगितलं, 'मी सहा वर्षाची असताना मला आई-बाबांनी साने गुरुजींच्या गोष्टींचे दहा भाग गिफ्ट म्हणून दिले होते.'
शाळेमधील आठवणी सांगताना स्पृहा म्हणाली, 'मी बालमोहन शाळेत शिक्षण घेतलं. मी सेमी इंग्लिशमध्ये शिकले. सेमी इंग्लिशच्या पहिल्या काही लेक्चर्समध्ये काहीच कळायचं नाही.'
स्पृहा ही सध्या ‘लोकमान्य’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
नेव्हर माईंड,पेईंग घोस्ट,बायोस्कोप,लहानपण देगा देवा,नांदी,समुद्र या नाटकांमध्ये स्पृहानं काम केलं.
तसेच तिनं मोरया, देवा या चित्रपटांमध्ये देखील तिनं भूमिका साकारली.
स्पृहानं छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अग्निहोत्र,आभाळमाया,उंच माझा झोका,एका लग्नाची दुसरी गोष्ट,एका लग्नाची तिसरी गोष्ट या मालिकांमधील स्पृहाच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.