‘केवळ गोविंदाची पत्नी म्हणून नाही तर…’ जया बच्चन यांचं उदाहरण देत सुनीता अहुजाचं मोठं विधान
गोविंदाची पत्नी एवढीच ओळख नाही जया बच्चनांचं उदाहरण देत सुनीता अहुजाचा ठाम संदेश.

Sunita Ahuja speaks up for her own identity beyond being Govinda’s wife.
1/12
गेल्या काही महिन्यांपासून गोविंदा आणि सुनीता अहुजा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे.
2/12
दोघांच्या संसारात मिठाचा खडा पडला असून, लवकरच ते दोघे काडीमोड घेणार असल्याची चर्चा होती.
3/12
चर्चा सुरू होताच सुनीता अहुजा प्रकाशझोतात आले होते. त्यांची गोविंदाची पत्नी एवढीच ओळख होती .
4/12
पण सध्या सुनीता त्यांची स्वतंत्र ओळख निर्माण करताना दिसतायेत.
5/12
सोशल मीडियातील वावर आणि मुलाखतींमुळे त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे.
6/12
नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सुनीता यांनी आपली एक इच्छा बोलून दाखवली .
7/12
सुनीता म्हणाल्या , त्यांना गोविंदाची पत्नी म्हणून नाही तर स्वतंत्र सुनीता म्हणून ओळख मिळावी अशी त्यांची इच्छा आहे .
8/12
जया बच्चन यांना जया भादुरी म्हणावं या जयाजींच्या संसदेतल्या भाषणच उदाहरण देत त्यांनी हे वक्तव्य केलं.
9/12
सुनीता म्हणाल्या, आयुष्याच्या 55 वर्षात मला नाव, सन्मान, आणि इज्जत सुनीता म्हणून हवी आहे, गोविंदाची पत्नी म्हणून नको, असं ते म्हणाले.
10/12
गोविंदाची पत्नी तर मी आहेच पण मी सुनीता अहुजा पण आहे. मला माझी स्वतःची ओळख निर्माण करायची आहे, असंही ते म्हणाले.
11/12
नातेसंबंध तर असतातच पण माणसाची स्वतःची ओळख देखील तितकीच महत्वाची आहे, असंही त्यांनी सांगितलं.
12/12
1987 साली गोविंदा आणि सुनीता यांनी विवाह केला होता.
Published at : 19 Jan 2026 03:53 PM (IST)