एक्स्प्लोर
12 वर्षांत केल्या 100 फिल्म्स, करिअर यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना काळाचा घाला, प्लेन क्रॅशमध्ये जीव गमावला; ओळखलं का कोण?
Soundarya Death Anniversary: अमिताभ बच्चन यांच्यासोबत सूर्यवंशम फिल्ममध्ये झळकलेल्या अभिनेत्रीनं सौंदर्यानं केवळ हिंदीच नाही तर तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळमसह अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केलं.
South Cinema Actress Soundarya Death Anniversary
1/10

'सूर्यवंशम'च्या राधा ठाकूर म्हणजेच सौंदर्या, ज्या हिरा ठाकूरच्या सोबतीनं उभ्या राहिल्या आणि हिरा ठाकूरला यशाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचवलं, त्यांनी खऱ्या आयुष्यात अगदी लहान वयातच जगाचा निरोप घेतला.
2/10

बरोबर 21 वर्षांपूर्वी, 17 एप्रिल 2004 रोजी, दाक्षिणात्य इंडस्ट्रीची प्रसिद्ध अभिनेत्री सौंदर्या सत्यनारायण हिचा विमान अपघातात मृत्यू झाला. सौंदर्यानं जगाचा निरोप घेतला, तेव्हा ती फक्त 31 वर्षांची होती.
3/10

सौंदर्यानं अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केलं असलं तरी, हिंदी प्रेक्षकही तिला चांगले ओळखतात. सौंदर्यानं अमिताभ बच्चन यांच्यासोबत सूर्यवंशममध्ये राधा ठाकूरची भूमिका साकारून लोकांच्या मनात स्थान निर्माण केलं.
4/10

या अभिनेत्रीनं खूप कमी वेळात यश मिळवलं. परिस्थिती अशी होती की, त्यानं 12 वर्षांत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय. सौंदर्यानं दक्षिणेतील जवळजवळ प्रत्येक चित्रपट उद्योगात काम केलंय, मग ते तमिळ असो वा तेलगू, कन्नड असो वा मल्याळम.
5/10

सौंदर्याचा मृत्यू झाला तेव्हा ती दोन महिन्यांची गर्भवती होती.
6/10

12 वर्षांच्या छोट्या कारकिर्दीत 100 हून अधिक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीनं तिच्या मृत्यूच्या एक वर्ष आधी 2003 मध्ये एका अभियंत्याशी लग्न केलं.
7/10

सौंदर्यानं अमिताभ बच्चन, रजनीकांत, मामूटी, मोहनलाल आणि कमल हासन यांच्यासह इतर सुपरस्टार्ससोबत काम केलं.
8/10

2002 मध्ये, सौंदर्याचा 'द्वीपा' हा कन्नड चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला.
9/10

सौंदर्यानं केवळ चित्रपटांमध्येच नव्हे तर राजकारणातही प्रवेश केला.
10/10

2004 मध्ये ती भारतीय जनता पक्षातही सामील झालेली.
Published at : 17 Apr 2025 09:07 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















