मिस्टर अँड मिसेस बांदेकर; पूजा बिरारी आणि सोहम बांदेकरनं बांधली साताजन्माची गाठ, नववधूच्य ग्रँड एन्ट्रीची सगळीकडे रंगलीय चर्चा PHOTOs
Soham Bandekar and Pooja Birari Wedding : सोहम बांदेकर, पूजा बिरारी यांचा विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. पूजा, सोहम यांनी लोणावळ्यात कुटुंबीय, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

Soham Bandekar and Pooja Birari Wedding
1/9
Soham Bandekar and Pooja Birari Wedding : सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांचा शाही विवाहसोहळा थाटामाटात पार पडला. पूजा आणि सोहम यांनी लोणावळ्यात कुटुंबीय, मित्रमंडळी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
2/9
गेल्या काही दिवसांपासून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकरांच्या होणाऱ्या सुनेबाबतच्या ज्या चर्चा रंगलेल्या, त्यावर अखेर शिक्कामोर्तब झालाय.
3/9
गेल्या बऱ्याच दिवसांपासून बांदेकरांच्या होणार्या सुनेची चर्चा संपूर्ण सिनेसृष्टीत रंगलेली. त्यावेळी पूजा बिरारीचं नाव समोर आलेलं, पण ना बांदेकर कुटुंबीय कुणाला काही सांगत होते, ना बिरारी कुटुंबीय...
4/9
अनेकदा सुचित्रा बांदेकर, आदेश बांदेकर यांच्यासह सोहम बांदेकर आणि पूजा बिरारी यांनाही थेट प्रश्न विचारले गेलेले, पण सर्वांनी सोयीस्कररित्या यावर बोलणं टाळलेलं. पण, अचानक लग्नसोहळ्याच्या विधींचे फोटो समोर आल्यानं सर्वांना गोड सरप्राईज मिळालं.
5/9
सध्या सोहम आणि पूजाच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोघांनी मोठ्या थाटामाटात आपली लग्नगाठ बांधली. लग्नाच्या फोटोंमध्ये पूजा आणि सोहमच्या वेडिंग लूकनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
6/9
पूजानं गुलाबी रंगाची साडी नेसून त्यावर पिवळ्या रंगाची शाल मॅच केलेली. तर, सोहमनं पूजाच्या साडीच्या रंगाला मॅचिंग डिझायनर कुर्ता वेअर केलेला. अशातच नवविवाहित मिस्टर अँड मिसेस बांदेकरांच्या हटके लूकचं सर्वत्र कौतुक केलं जातंय.
7/9
पूजा आणि सोहमच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. या व्हिडीओत पूजानं खास अंदाजात लग्नमंडपात एन्ट्री घेतलीय. सर्वांनी टाळ्या वाजवून पुजाचं स्वागत केलं.
8/9
लग्नाच्या आधी ती सोहमकडे पाहून गोड हसताना दिसली. पूजाच्या एन्ट्रीच्या वेळी उपस्थित पाहुण्यांनी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला. त्यानंतर विधीवत सोहम आणि पूजाचा लग्नसोहळा पार पडला. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
9/9
लोणावळ्यातील एका रिसॉर्टमध्ये सोहम आणि पूजाचा विवाहसोहळा पार पडला. दोघांच्या लग्नाला अनेक मराठी कलाकारांची उपस्थिती होती.
Published at : 03 Dec 2025 07:21 AM (IST)