Shraddha’s voice in Zootopia 2 : श्रद्धा कपूरचा हॉलिवूड डेब्यू? झूटोपिया 2 मध्ये देणार आवाज

Shraddha’s voice in Zootopia 2 : श्रद्धा कपूर डिस्नेच्या झूटोपिया २ मध्ये ‘जूडी हॉप्स’ च्या हिंदी आवाजासाठी निवडली गेली असून, या घोषणेनंतर तिचा हॉलिवूड डेब्यू चर्चेत आला आहे.

Continues below advertisement

Shraddha’s voice in Zootopia 2

Continues below advertisement
1/10
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरने आता बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्येही पाऊल ठेवलं आहे. श्रद्धाच्या चाहत्यांसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे.
2/10
डिस्नेच्या झूटोपिया 2 या प्रसिद्ध ऍनिमेटेड चित्रपटात श्रद्धा कपूर 'जूडी हॉप्स' या पात्राला हिंदीत आवाज देणार आहे. हे पात्र जगभरात खूप लोकप्रिय आहे.
3/10
डिस्ने फिल्म्स इंडियाने त्यांच्या इंस्टाग्रामवर श्रद्धाचा पहिला लूक शेअर करत ही घोषणा केली. काही तासांतच हा पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल झाला.
4/10
ही श्रद्धासाठी एक मोठी संधी मानली जातेय. बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर आता ती आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण करतेय.
5/10
तिच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला भरपूर शुभेच्छा दिल्या. अनेकांनी कॅप्शनमध्ये लिहीलंय की, "श्रद्धा आता ग्लोबल स्टार होणार आहे." सर्वांनाच अपेक्षा आहे की तिचा आवाज 'जूडी हॉप्स'च्या पात्राला अधिक आकर्षक बनवेल.
Continues below advertisement
6/10
झूटोपिया 2 चा हिंदी व्हर्जन 28 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहतायत.
7/10
मात्र थोड्याच वेळात डिस्नेने ही पोस्ट डिलीट केली. तरीदेखील, तिचा स्क्रीनशॉट इंटरनेटवर व्हायरल झाला आहे आणि त्यावर चर्चा सुरूच आहे.
8/10
ही पोस्ट का डिलीट करण्यात आली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.
9/10
सध्या श्रद्धा कपूर 'स्त्री 3' आणि 'नानी' या दोन चित्रपटांमध्ये झळकणार आहे. हे दोन्ही चित्रपट तिच्या करिअरसाठी महत्त्वाचे प्रोजेक्ट्स मानले जातायत.
10/10
तसेच ती मराठी कलाकार नारायणराव गन्नागरकर यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. या भूमिकेसाठी ती लावणी नृत्य शिकतेय. चित्रपटाचं शूटिंग नुकतंच सुरू झालं आहे.
Sponsored Links by Taboola