Shiv Thackeray New House: आगीत जळून घर भस्मसात, मराठमोळ्या अभिनेत्यानं पुन्हा उभारला आलिशान आशियाना; फराह खाननं दाखवली खास झलक, PHOTO's
शिव ठाकरेच्या मुंबईतील राहत्या घराला काही महिन्यांपूर्वी आग लागलेली. आता त्याने पुन्हा त्याचा सुंदर आशियाना उभारलाय
Continues below advertisement

Shiv Thackeray New House
Continues below advertisement
1/10
Shiv Thakeray: बिग बॉस, एमटीवी रोडीज, रोडीज रायझिंग अशा अनेक रियालिटी शो मधून घराघरात पोहोचलेला शिव ठाकरे सध्या त्याच्या नव्या घरामुळे चर्चेत आला आहे.
2/10
काही महिन्यांपूर्वी शिवच्या जुन्या घराला भीषण आग लागली होती, त्यानंतर आता शिव मुंबईतील नव्या घरात शिफ्ट झाला आहे.
3/10
त्याच्या या खास घराची झलक बॉलीवूडची लोकप्रिय दिग्दर्शिका आणि कोरिओग्राफर फराह खानने अलीकडेच तिच्या youtube ब्लॉगमधून दाखवली.
4/10
या नव्या घराची सजावट स्वतः शिव ठाकरेने केली आहे. घर छोटसं असलं तरी अतिशय साधने आकर्षक आहे. लिव्हिंग रूममध्ये टीव्ही सोफा सेट असून शिव बहुतेक वेळा इथेच कुटुंबासोबत वेळ घालवतो.
5/10
घरातील एका खास भिंतीवर शिवने आई आणि आजीच्या हातांचे ठसे प्रेम करून ठेवले आहेत. घराबाहेर पडण्यापूर्वी तो दररोज या फ्रेमला स्पर्श करून आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडत असल्याचं त्याने सांगितलं.
Continues below advertisement
6/10
घरातील देवघरही लक्ष वेधून घेणार आहे. मराठमोळा अभिनेता शिव ठाकरे रोज सकाळी पूजा करून दिवसाची सुरुवात करतो.
7/10
दरम्यान शिव ठाकरेच्या नव्या घरी दिग्दर्शिका फराह खान एका शूट साठी गेल्यानंतर तिने क्रियेटर साहिदा अन्सारी बद्दलची एक खास गोष्ट सांगितली. पराहतीच्या घरी ब्लॉग शूटिंगसाठी गेल्यानंतर साहित्याला झी टीव्हीवरील कुकिंग शोची संधी मिळाल्याचे तिने सांगितलं.
8/10
दरम्यान शिवच्या घरातील छोट्याशा किचनमध्ये शिवच्या आईने आणि आजीने फराहसाठी खास महाराष्ट्रीयन जेवण बनवलं होतं.
9/10
यावेळी शिवच्या आजीने साडीच्या पदराने आणि घरातील झाडूने फराह खानची दृष्ट काढली. त्यानंतर फराहने शिवच्या आईला तिच्या घरी येण्याचं खास निमंत्रणही दिलं.
10/10
काही महिन्यांपूर्वी बिग बॉस मराठीचा विजेता शिव ठाकरेच्या मुंबईतील राहत्या घराला नुकतीच आग लागलेली. आग फारच भीषण होती, या आगीत शिवचं घर अक्षरशः भस्मसात झालं.
Published at : 27 May 2026 12:01 PM (IST)