Box Office Collection: साऊथच्या या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धडाका; ‘द केरला स्टोरी 2’लाही टाकलं मागे, ‘बॉर्डर 2’ची घसरण
सध्या चित्रपटगृहांमध्ये अनेक हिंदी आणि साऊथ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र शनिवारी बॉक्स ऑफिसवर साऊथच्या एका चित्रपटाने सर्वांना मागे टाकत जोरदार कमाई केली.

Entertainment
1/6
‘थाई किझावी’ या चित्रपटाने शनिवारी सर्वाधिक कलेक्शन करत बॉलिवूड चित्रपटांनाही मागे टाकलं. दुसरीकडे काही चित्रपटांची कमाई मात्र खूपच कमी झालेली दिसत आहे.
2/6
अलीकडेच प्रदर्शित झालेला ‘किस्सा कोर्ट कचहरी का’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा प्रभाव पाडू शकलेला नाही. रिलीज होऊन दोन दिवस झाले असतानाही चित्रपटाची कमाई अत्यंत कमी आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने केवळ 1 लाखांची कमाई केली होती, तर दुसऱ्या दिवशी सुमारे 7 लाखांचा गल्ला जमवला.
3/6
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला ‘द केरला स्टोरी 2’ हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर ठीकठाक कमाई करताना दिसत आहे. शनिवारी चित्रपटाने सुमारे 2.96 कोटी रुपयांची कमाई केली.
4/6
बॉर्डर 2 या चित्रपटाची कमाई आता कमी होताना दिसत आहे. शनिवारी या चित्रपटाने सुमारे 9 लाख रुपयांची कमाई केली. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत.
5/6
‘मर्दानी 3’ या चित्रपटाने शनिवारी सुमारे 20 लाख रुपये कमावले. या चित्रपटात राणी मुखर्जी मुख्य भूमिकेत असून ती पुन्हा एकदा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली तयार झाला आहे.
6/6
साऊथचा ‘थाई किझावी’हा चित्रपट मात्र बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. रिलीजच्या 16 व्या दिवशी या चित्रपटाने तब्बल 3.71 कोटी रुपयांची कमाई केली.
Published at : 15 Mar 2026 01:43 PM (IST)