Samantha Ruth Prabhu : इंडियन आउटफिट्स विथ वेस्टर्न टच; समंथाकडून घ्या स्टायलिंग टिप्स
प्रसिद्ध दाक्षिणात्या अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) लाखो तरुणांच्या गळ्यातील ताईत आहे. तिच्या अदा आणि लूक्सवर अनेकजण फिदा आहेत. सोशल मीडियावर समंथा नेहमीच आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (@samantharuthprabhuoffl/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजर तुम्हीही इंडियन आउटफिट्स वेस्टर्न टचसह वेअर करणं पसंत करत असाल तर तुम्ही समंथाकडून स्टायलिंग टिप्स घेऊ शकता. (@samantharuthprabhuoffl/Instagram)
समंथानं एक चंदेरी कुर्ता मॅचिंग प्लाझो पँटसोबत पेअर केला होता. त्यासोबतच मॅचिंग लॉन्ग जॅकेटसह अभिनेत्रीनं इंडियन लूकला वेस्टर्न टच दिला होता. (@samantharuthprabhuoffl/Instagram)
लाल रंगाच्या साडीत समंथा अत्यंत सुंदर दिसतेय. तिनं साडी ट्रेडिशनल पद्धतीनं नेसली असून थाय-हाय स्लिट स्कर्टसह स्टाईल केलं होतं. (@samantharuthprabhuoffl/Instagram)
यलो कलरचा आउटफिटही समंथानं जॅकेटसोबत स्टाइल केलं आहे. परफेक्ट ज्वेलरी आणि न्यूड मेकअपमुळं समंथाचा लूक आणखी सुंदर दिसतोय. (@samantharuthprabhuoffl/Instagram)
ब्लॅक स्कर्ट आणि ब्रालेट ब्लाउजला समंथानं ट्रेडिशनल जॅकेटसह स्टाइल केलं होतं. सोशल मीडियावर अभिनेत्रीचा लूक खूपच व्हायरल होत होता. (@samantharuthprabhuoffl/Instagram)