चेहऱ्यावर तेज अन् आनंद; दुसऱ्या लग्नानंतर समांथा गेली हनिमूनला, खास PHOTO व्हायरल
Samantha Ruth Prabhu Shares Honeymoon photo: समांथा रूथ प्रभू आणि राज निदिमोरू यांनी १ डिसेंबरला गुपचूप विवाह केला. लग्नानंतर हे कपल पोर्तुगालमध्ये हनिमूनचा आनंद घेत आहे.

Samantha Ruth Prabhu Shares Honeymoon Moments
1/10
अभिनेती समांथा रूथ प्रभू सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. तिने नुकतंच दिग्दर्शक राज निदिमोरू यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. १ डिसेंबरला दोघांचा विवाहसोहळा पार पडला.
2/10
त्यांनी ईशा फाउंडेशन सेंटर येथील लिंग भैरवी मंदिरात लग्न केले होते. या गुपचूप लग्नाने सर्वांनाच धक्का दिला.
3/10
राज आणि समांथा दोघांचेही हे दुसरे लग्न होते. हे जोडपे सध्या पोर्तुगालमध्ये त्यांचा हनिमून एन्जॉय करत आहेत.
4/10
समांथा प्रभूने त्यांच्या सुट्टीतील अनेक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये ती जेवणाचा आस्वाद घेताना दिसत आहे. अभिनेत्री हे क्षण खूप एन्जॉय करताना दिसत आहे.
5/10
या फोटोंमध्ये समांथा शहरातील विविध ठिकाणी पोज देताना दिसत आहे. एका फोटोमध्ये तिचा पती डोनटचा आस्वाद घेत असल्याचेही दिसत आहे.
6/10
समांथाने फेमस मॉन्युमेंटचे फोटो आपल्या पोस्टगद्वारे शेअर केले आहेत. Basilica of Our Lady of the Rosary, Padrão dos Descobrimentos, Arco da Rua Augusta याचे फोटो शेअर केले आहे.
7/10
तिने तिचे निरोगी आणि चविष्ट जेवणही चाहत्यांसोबत शेअर केले आहे. अभिनेत्रीने अॅव्होकॅडो, क्रोइसंट, सिनामन रोल आणि कॉफीचाही आस्वाद घेतला आहे.
8/10
तिने काही समुद्रकिनाऱ्यावरील फोटोही सोशल मिडियात शेअर केले आहे.
9/10
समांथा रूथ प्रभूच्या फोटोंवरून स्पष्टपणे दिसून येते की, ती आयुष्याचा पुरेपूर आनंद घेत आहे.
10/10
समांथा रूथ प्रभू आपल्या पतीसोबत नवीन देशात एकत्र वेळ घेत आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत असून, या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट्स करून शेअर केले आहेत.
Published at : 31 Dec 2025 11:42 AM (IST)