सैय्यारा' आवडला असेल तर, मोहित सुरीच्या 'या' फिल्म्स नक्की पाहा!
MOHIT SURI FILM : मोहित सुरीचा सैय्यारा सिनेमा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. जर तुम्हीही मोहित सुरीच्या सैय्याराचे फॅन झाला असाल, तर त्यानंच दिग्दर्शित केलेले इतरही काही सिनेमे नक्की आवडतील.

MOHIT SURI
1/8
दिग्दर्शक मोहित सुरीचा 'सैय्यारा' सिनेमा सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. जर तुम्हीही मोहित सुरीच्या 'सैय्यारा'चे फॅन झाला असाल, तर त्यानंच दिग्दर्शित केलेले इतरही काही सिनेमे तुम्हाला नक्की आवडतील.
2/8
'सैय्यारा'ची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. या सिनेमाच्या माध्यमातून अहान पांडे ,अनीत पड्डाया या दोन नवख्या कलाकारांसोबतच दिग्दर्शक मोहित सुरीवरही कौतुकाचा वर्षाव केला जातोय.
3/8
'सैय्यारा'च्या माध्यमातून मोहित सुरी यानं परत एकदा प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. मोहित सुरीनं याआधीही सुपरहिट चित्रपट केलेत.
4/8
मोहित सुरीच्या सुपरहिट सिनेमांच्या यादीत सर्वात पहिलं नाव आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरच्या 'आशिकी 2' चित्रपटाचं येतं. मोहित सुरीनं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. हा सिनेमा तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
5/8
'मर्डर 2'मध्ये इमरान हाशमी आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली. या चित्रपटाचा जॉनर रोमँटिक आणि थ्रीलर आहे. हा सिनेमा तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
6/8
'हमारी अधुरी कहानी' सिनेमादेखील मोहित सुरीनं दिग्दर्शिक केला आहे. या चित्रपटात इमरान हाशमी आणि विद्या बालन यांनी अतिशय चांगला अभिनय केला होता. हा सिनेमा तुम्ही प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
7/8
मोहित सुरीचा 'आवारापन' जेव्हा प्रदर्शित झाला होता, तेव्हा तो चित्रपटगृहात फ्लॉप ठरला. पण, काही काळानं मात्र सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला आणि त्याची खूप चर्चा झाली. आता या चित्रपटाचा दुसरा सिक्वल देखील रिलीज होणार आहे. या चित्रपटाला डायरेक्टरच्या करियरचा कल्ट क्लासिक असं म्हटल जातं. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स वर बघू शकता.
8/8
'एक व्हिलन' हा सिनेमा मोहित सुरीच्या करियरचा आणखी एक सुपरडुपर हिट सिनेमा ठरला. या चित्रपटाची गोष्ट एका सिरिअल किलर भोवती फिरते. हा चित्रपट तुम्ही नेटफ्लिक्स, जिओ सिनेमा आणि प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.
Published at : 25 Jul 2025 03:57 PM (IST)