Riteish Deshmukh Raja Shivaji: '...हा दिग्दर्शन करणार? बघू काय दिवे लावतो...', रितेश देशमुख यानं सांगितलं दिग्दर्शक होण्याच्या निर्णयामागचं 'ते' मोठं कारण
Ritesh Deshmukh On Direction: मराठी सिनेमा वेडमधून अभिनेते रितेश देशमुखनं दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्या सिनेमा प्रचंड गाजला.

Ritesh Deshmukh On Direction
1/10
Ritesh Deshmukh On Direction: मराठी सिनेमा 'वेड'मधून अभिनेते रितेश देशमुखनं दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्या सिनेमा प्रचंड गाजला.
2/10
आता त्यानंतर रितेश देशमुख त्याचा आगामी सिनेमा 'राजा शिवाजी'मुळे चर्चेत आहे. या सिनेमात रितेशनं दिग्दर्शक म्हणून भूमिका बजावली आहेच, पण त्यासोबतच या सिनेमात त्यानं छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिकासुद्धा साकारली आहे.
3/10
पण, दिग्दर्शक म्हणून काम करताना त्याला काही प्रमाणात ताण आणि दडपणही जाणवलं होतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रितेश देशमुख यानं दिग्दर्शन करण्याचा निर्णय का आणि कसा घेतला? आणि त्या मागची कहाणी काय होती, याबद्दल सविस्तर खुलासा केलाय...
4/10
अभिनेता रितेश देशमुख यानं अथर्व सुदामेला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यानं इंडस्ट्रीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करतानाचा त्याचा अनुभव सांगितला.
5/10
अभिनेता रितेश देशमुख म्हणाला की, "जेव्हा मी सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी माझ्या वडिलांना ही गोष्ट सांगितली. तेव्हा मी आर्किटेक्ट म्हणून काम करत होतो. माझी स्वत:ची एक फर्म होती. त्यांनी मला विचारलं की, तू निर्मिती करणार आहेस का? मी म्हटलं नाही, मी अभिनय करणार आहे... ते मला म्हणाले की, ठरवं... तुझं आयुष्य आहे काय करायचं ते तू ठरव..."
6/10
पुढे बोलताना रितेश देशमुखनं सांगितलं की, "मी त्यांना म्हणालो की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात आणि मला कोणीच ओळखत नाही. आणि असं कोणी नाही की तुम्हाला ओळखत नाही. पण मी जेव्हा सिनेमात काम करेन आणि तेव्हा माझ्या लिहिलं जाईल. तेव्हा माझं काम चांगलं झालं नाही तर कदाचित तुमच्या नावाची बदनामी होऊ शकते. म्हणून मी तुम्हाला विचारतोय काय केलं पाहिजे..."
7/10
इंडस्ट्रीत येण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी वडील विलासराव देशमुखांसोबत झालेल्या संवादाबाबत सांगताना रितेश देशमुखनं सांगितलं की, "त्यांनी मला एक वाक्य सांगितलं की, तू तुझ्या नावाची काळजी घे... मी माझ्या नावाची घेतो... त्यांचं हे वाक्य खूप काही शिकवून जातं..."
8/10
"आपण चांगलं काम केलं आणि प्रामाणिकपणे केलं तर लोकांना ते आवडतं. जेव्हा मी 'वेड' दिग्दर्शित करणार होतो, तेव्हा चार लोक काय म्हणतील असा विचार आला...", असं रितेश देशमुख म्हणाला.
9/10
जेवढं दिसतं तेवढं ते सोपं नाही. कारण इतकी वर्ष अभिनेता म्हणून काम केल्यानंतर आता हा दिग्दर्शित करणार का? बघू आता काय दिवे लावतो, असा प्रश्न येतोच...", असं रितेश देशमुख म्हणाला.
10/10
"मी सेटवर गेल्यानंतर आतापर्यंत कॅमेऱ्यासमोर होता आता हा सांगणार का शॉट कसा लावायचा..हे असतंच. जेव्हा मी निर्णय घेतला तेव्हा जिनिलीया म्हणाली की, काय होईल जास्तीत जास्त...वाईट सिनेमा होईल. कदाचित नाही जमणार, पण प्रयत्न तर केले... म्हणून 'वेड' त्या प्रयत्नातून झाला...", असं रितेश देशमुख म्हणाला.
Published at : 27 Apr 2026 09:58 AM (IST)