एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
रितेश-जिनेलियाचा वेडिंग अलबम, दादा-वहिनींच्या लग्नाचे फोटो
Riteish Deshmukh and Genelia d Souza : रितेश-जिनेलियाचा वेडिंग अलबम, दादा-वहिनींच्या लग्नाचे फोटो एका क्लिकवर
Riteish Deshmukh and Genelia d Souza
1/10

अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया यांची पहिली भेट 2003 साली ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटामधून दोघांनी बॉलिवूडमध्ये एकत्र पदार्पण केलं आणि चित्रपटाच्या दरम्यानच दोघांमध्ये प्रेम फुललं.
2/10

हाच क्षण त्यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात ठरला. त्यानंतर 2012 साली त्यांनी मोठ्या थाटामाटात लग्न केलं.
3/10

रितेश आणि जेनेलियाचं लग्न बॉलिवूडमधील भव्य विवाहसोहळ्यांपैकी एक मानलं जातं.
4/10

एका मुलाखतीमध्ये जेनेलियाने रितेश देशमुख यांच्याबद्दल एक मोठा खुलासा केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, जेनेलियाने सांगितलं होतं की त्यांच्या पहिल्या भेटीत तिला रितेश थोडा घमेंडी वाटला होता.
5/10

कारण रितेश हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा सुपुत्र आहे, त्यामुळे तिला वाटलं होतं की, त्याला इगो असेल..
6/10

रितेश आणि जेनेलियाची जोडी खरी आयुष्यात जितकी हिट आहे, तितकीच ती ऑनस्क्रीन देखील आहे. त्यांच्या चाहत्यांना त्यांची केमिस्ट्री खूपच भावते.
7/10

2012 साली आलेल्या ‘तेरे नाल लव हो गया’ या चित्रपटात त्यांच्या केमिस्ट्रीचं सुंदर दर्शन घडलं होतं. त्यानंतर 2014 साली ते ‘लय भारी’ या मराठी चित्रपटात एकत्र दिसले होते.
8/10

सध्या हे स्टार कपल दोन गोंडस मुलांचे पालक असून त्यांचं वैवाहिक आयुष्य आनंदाने व्यतीत करत आहेत. रितेश आणि जेनेलिया सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह आहेत.
9/10

ते त्यांच्या इंस्टाग्राम आणि अन्य सोशल मीडिया अकाउंट्सवर नेहमीच क्युट फोटो आणि रील शेअर करत असतात.
10/10

त्यांच्या चाहत्यांकडूनही लाइक्स आणि कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्यावर भरभरून प्रेम व्यक्त केलं जातं.
Published at : 10 Jun 2025 03:02 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















