Rashmika-Vijay Wedding: एक-दुजे के लिए... उदयपूरमध्ये रश्मिका-विजयचं थाटामाटात लग्न; कपलच्या रॉयल वेडिंगचे Unseen Photos
Rashmika-Vijay Wedding Photos: कित्येक वर्ष अफेअर लपवल्यानंतर, रश्मिका आणि विजय यांनी अखेर लग्न केलंय. हे जोडपं आता ऑफिशियली मॅरिड झालं असून इंडस्ट्रीच्या पॉवर कपल्सच्या यादीत समाविष्ट झालंय.

Rashmika-Vijay Wedding
1/13
दक्षिणेतील सर्वात लोकप्रिय जोडपं, रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांनी अखेर 26 फेब्रुवारी रोजी एका खासगी विवाहसोहळ्यात लग्न उरकलं. या जोडप्यानं तेलुगू आणि कोडावा परंपरेनुसार उदयपूरमधील आयटीसी मेमेंटोस इथे लग्न केलंय. आता, या जोडप्याच्या शाही लग्नातील काही अनसीन फोटो समोर आले आहेत.
2/13
सोशल मीडियावर रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्याच चर्चा आहेत. या जोडप्याच्या लग्नाच्या फोटोंवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
3/13
हा फोटो रश्मिका आणि विजयच्या वरमाला समारंभातील आहे. हे नवविवाहित जोडपं एकमेकांमध्ये हरवलेलं दिसतंय.
4/13
या फोटोमध्ये रश्मिका आणि विजय एका विंटेज कारमध्ये बसलेले दिसतायत, दोघेही वधु-वराच्या साजात सुंदर दिसतायत. गाडीच्या मागच्या बाजूला असलेल्या हॉर्ट शेपच्या बॅनरवर 'विरोश वेडिंग', असं लिहिलंय.
5/13
हा फोटो एका समारंभातील आहे, ज्यामध्ये रश्मिका आणि विजय यांनी एकमेकांना वरमाला घातलेली दिसतेय. हे जोडपं खूप आनंदी दिसतंय.
6/13
या फोटोमध्ये, वधूच्या वेशभूषेत असलेली रश्मिका खूप इमोशनल झाल्याचं पाहायला मिळतंय. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळल्याचं दिसतंय.
7/13
या फोटोमध्ये, विजय आणि रश्मिका घट्ट मिठीत हरवून गेलेत.
8/13
हा वधू-वराच्या एन्ट्रीचा फोटो आहे, ज्यामध्ये पाहुणे नवविवाहित जोडप्यावर फुलांचा वर्षाव करताना दिसत आहेत.
9/13
या फोटोमध्ये रश्मिका विजयला किस करताना दिसतेय.
10/13
या फोटोमध्ये रश्मिका आणि विजय एकत्र खूप आनंदी दिसतायत.
11/13
या फोटोमध्ये रश्मिका वधूच्या रूपात खूपच सुंदर दिसतेय. लाल साडी आणि सोन्याच्या दागिन्यांनी मढलेली अभिनेत्री एखाद्या स्वर्गीय अप्सरापेक्षा कमी दिसत नाही.
12/13
या फोटोमध्ये, वधू आणि वर एकत्र एक विधी करताना दिसत आहेत.
13/13
बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरीची मुलगी एरियाना देखील रश्मिका आणि विजयच्या लग्नाला उपस्थित होती.
Published at : 27 Feb 2026 11:53 AM (IST)