'पुष्पा' गर्लचा घर नाही 'राजवाडा' पाहिलात का? साध्या घरावरुन नजर हटणारच नाही, 'ऑरा'वर रश्मिकाचं विशेष प्रेम
Rashmika Mandanna home interior tour with photos: रश्मिका मंदाना लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. तिच्या आलिशान घराची झलक आपण पाहिलीत का?
Continues below advertisement

Rashmika Mandanna house tour
Continues below advertisement
1/8
रश्मिका मंदाना. दाक्षिणात्य अभिनेत्रीनं केवळ साऊथमध्ये नसून, हिंदी सिनेसृष्टीतही आपलं नाव कमावलं आहे. तिनं आपल्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर तयार केलं. केवळ चित्रपटांमध्येच नाही तर, ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. ती नेहमी साधं सिंपल आयुष्य जगण्यास प्राधान्य देते.
2/8
खऱ्या आयुष्यात रश्मिका सिंपल आयुष्य जगते. तिचं घर नेमकं कसं आहे? हे जाणून घेण्यासाठी तिचा प्रत्येक चाहता उत्सुक असतो. दरम्यान, अलिकडेच तिच्या घरातील इनसाइड फोटो समोर आले आहेत. या फोटोतून तिच्या घराची आणि साध्या जीवनशैलीची झलक दिसते.
3/8
रश्मिका मंदाना सध्या लग्नाच्या चर्चांमुळे प्रकाशझोतात आहे. विजय देवरकोंडासोबत तिचा विवाह होणार असल्याची माहिती आहे. हे जोडपं एकमेकांना बऱ्याच काळापासून एकमेकांना डेट करत होते. दरम्यान, त्यांच्या लग्नाच्या बातम्या चाहत्यांमध्ये व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही 26 फेब्रुवारी रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत.
4/8
रश्मिका मंदानाकडे 66-70 कोटींची मालमत्ता आहे. कर्नाटकमधील तिच्या घराची किंमत 8 कोटी असल्याचं सांगितले जात आहे. त्यांच्या घराचे लॉन मोठे आणि हिरवेगार आहे. रश्मिका निर्सगप्रेमी असल्याचं दिसून येते.
5/8
रश्मिकाकडे 'ऑरा' नावाचा पाळीव कुत्रा आहे. सोशल मीडियावरील फोटोवरुन तिच्या घराची झलक दिसते. या फोटोंमध्ये ती ऑरासोबत खेळताना आणि आराम करताना दिसते.
Continues below advertisement
6/8
तिच्या घराचा टेरेस देखील खूप मोठा आहे. रश्मिका अनेकदा येथे फोटोशूटसाठी पोज देताना दिसते. मोकळ्या आकाशात रश्मिकाचे सौंदर्य आणखी खुलते.
7/8
रश्मिकाच्या घरातील आतील भाग भव्य आणि साधं आहे. तिनं घराला पांढरा, राखाडी रंग दिला आहे. या रंगामुळे घरात शांतता आणि सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
8/8
रश्मिका स्वत: तिच्या घरात बागकाम करते. यावरुन तिचा साधेपणा आणि निर्सगावरील प्रेम स्पष्टपणे दिसून येते.
Published at : 18 Feb 2026 02:06 PM (IST)