प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर, लंकाधीश 'रावण' साकारतोय यश; 4000 कोटींच्या 'रामायण'मध्ये कोण कोणत्या भूमिकेत?
Ramayana Cast Net Worth: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित रामायण सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. 2026 मधील सर्वाधिक प्रतीक्षित सिनेमांपैकी हा एक मानला जातो.
Continues below advertisement

Ramayana Cast Net Worth
Continues below advertisement
1/13
Ramayana Cast Net Worth: दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित 'रामायण' सिनेमाची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत. 2026 मधील सर्वाधिक प्रतीक्षित सिनेमांपैकी हा एक मानला जातो. 4000 कोटींच्या या सिनेमात दिग्गज कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळतेय. जाणून घेऊया, 'रामायण' सिनेमात कोणत्या भूमिकेत कोण झळकणार?
2/13
रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे आणि यश यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'रामायण' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलरची झलक पाहून चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. सोशल मीडियावर ट्रेलरला जबरदस्त प्रतिसाद मिळत असून प्रेक्षकांकडून त्याचं भरभरून कौतुक होतंय.
3/13
'रामायण' सिनेमात रणबीर कपूर भगवान श्रीरामांच्या भूमिकेत झळकणार आहे. या भूमिकेसाठी त्यानं फिटनेसवर विशेष मेहनत घेतली असून खास प्रशिक्षणही घेतलंय. श्रीरामांच्या भूमिकेत रणबीरला पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक झालेत.
4/13
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात साऊथ सुपरस्टार यश लंकाधिपती रावणाच्या भूमिकेत झळकणार आहेत. 'केजीएफ' फेम यश सिनेमाचे सहनिर्मातेही आहेत. ट्रेलरमधील त्यांचा दमदार लूक आणि राजेशाही थाटाचं मोठं कौतुक होत असून रावणाच्या भूमिकेत त्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
5/13
सिनेमात सीता मातेची भूमिका अभिनेत्री साई पल्लवी साकारतेय. ट्रेलरमध्ये तिचा शांत, संयमी आणि सात्त्विक अभिनय प्रेक्षकांना खूप आवडलाय. या भूमिकेत तिला पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
Continues below advertisement
6/13
'रामायण'मध्ये रवी दुबे भगवान श्रीरामांचे धाकटे बंधू लक्ष्मण यांची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमधील त्याच्या लूकचीही चांगलीच चर्चा होत असून प्रेक्षक त्यांना या भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
7/13
रकुल प्रीत सिंह सिनेमात शूर्पणखेच्या भूमिकेत दिसणार आहे. ट्रेलरमधील तिची झलक सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.
8/13
सिनेमात लारा दत्ता राजा दशरथ यांच्या पत्नी आणि भगवान श्रीरामांच्या सावत्र आई कैकयी यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमधील त्यांचा शाही अंदाज आणि दमदार स्क्रीन प्रेझेन्सचं कौतुक होतंय.
9/13
अरुण गोविल 'रामायण'मध्ये राजा दशरथ यांच्या भूमिकेत झळकणार आहे. विशेष म्हणजे, याआधी त्यांनी रामानंद सागर यांच्या 'रामायण' मालिकेत भगवान श्रीरामांची भूमिका साकारली होती. आता ते श्रीरामांच्या वडिलांच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे.
10/13
'रामायण'मध्ये श्री रामाचा भाऊ भरत याची भूमिका अभिनेता आदिनाथ कोठारे साकारतोय आणि श्री रामाच्या लहान भाऊ शत्रुघ्न याची भूमिका नितीश शर्मा करत आहे. श्रीरामांचे धाकटे बंधू शत्रुघ्न यांच्या भूमिकेत अभिनेता नितीश शर्मा दिसणार आहेत.
11/13
सिनेमात शीबा चड्ढा मंथरेची भूमिका साकारत आहेत. रामायणातील ही एक महत्त्वाची भूमिका मानली जाते.
12/13
विवेक ओबेरॉय सिनेमात विद्युतजिह्वा या पात्राच्या भूमिकेत झळकणार आहे. विद्युतजिह्वा हा शूर्पणखेचा पती आणि एक पराक्रमी दानव होता. या भूमिकेत त्यांना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
13/13
'रामायण'मध्ये सनी देओल पवनपुत्र हनुमान यांच्या भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, ट्रेलरमध्ये हनुमानाची झलक न दाखवल्यामुळे काही चाहते नाराज झालेत. आता सिनेमात त्यांचा दमदार अवतार पाहायला मिळेल, अशी चाहत्यांना आशा आहे.
Published at : 31 Jul 2026 02:11 PM (IST)