स्ट्रगल काळात मैत्री ते फिल्मी प्रपोज, दीड वर्षांच्या डेटिंगनंतर लग्नगाठ बांधली, अशी आहे प्रिया- शंतनूची Love Story
शनिवारी पहाटे मुंबईच्या (Mumbai news) पश्चिम उपनगरातील मीरारोड येथील निवासस्थानी तिची प्राणज्योत मालवली.
Priya Shantanu Love Story
1/6
राठी आणि हिंदी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं असून मनोरंजनसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे.
2/6
प्रियाने ‘या सुखानो या’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांबरोबरच हिंदी मालिकांमध्येही दमदार कामगिरी केली. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून तिने घराघरात लोकप्रियता मिळवली.
3/6
प्रियाचं खासगी आयुष्य देखील प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय असे. अभिनेता शांतनू मोघे याच्यासोबतचं तिचं नातं नेहमीच कौतुकास्पद मानलं गेलं. हे जोडपं मराठी सिनेसृष्टीतील आयडियल कपल म्हणून ओळखलं जायचं. आज प्रियाच्या निधनाने शांतनूवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
4/6
प्रिया आणि शांतनूची ओळख एका कॉमन मैत्रिणीमुळे झाली होती. तेव्हा दोघंही अभिनय क्षेत्रात आपलं स्थान निर्माण करण्यासाठी झगडत होते. सुरुवातीला साधी ओळख असलेलं नातं पुढे घट्ट मैत्रीत बदललं. विचार जुळायला लागल्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले.
5/6
दीड वर्षांच्या डेटिंगनंतर शांतनूने प्रियाला अगदी फिल्मी स्टाइलने प्रपोज केलं होतं. तो तिला फिल्म सिटीमध्ये घेऊन गेला आणि चांदण्याच्या प्रकाशात गुडघ्यांवर बसून तिला प्रपोज केलं. प्रियानेही तत्काळ होकार दिला. मात्र, काही काळ त्यांनी आपलं नातं गुपित ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
6/6
२४ एप्रिल २०१२ रोजी या दोघांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतरही या जोडीने केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे तर व्यवसायातही पाऊल टाकलं. त्यांनी मिळून एक कॅफे सुरू केला होता. सोशल मीडियावरूनही या जोडप्याने अनेकदा एकमेकांप्रतीचं प्रेम दाखवलं आणि चाहत्यांची मनं जिंकली.
Published at : 31 Aug 2025 12:53 PM (IST)