Prateik Babbar Wedding: दुसऱ्यांदा लग्नाच्या बेडीत अडकला 'या' दिग्गज मराठी अभिनेत्रीचा लेक; नववधूसोबतच्या लिपलॉकमुळे PHOTO चर्चेत
Prateik Babbar Wedding: दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बर पुन्हा एकदा लग्नबंधनात अडकला आहे. लग्नानंतर या जोडप्याचे पहिले फोटोही समोर आले आहेत.

Prateik Babbar Wedding PHOTOs
1/7
बॉलिवूड अभिनेता प्रतीक बब्बरनं व्हॅलेंटाईन डे म्हणजेच, 14 फेब्रुवारी रोजी त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीसोबत लग्नगाठ बांधली. लग्नात हे नवदाम्पत्य शाही लूकमध्ये दिसलं.
2/7
अभिनेता प्रतीक बब्बर हा ज्येष्ठ अभिनेते राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. ज्यानं आज त्याची प्रेयसी प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं.
3/7
प्रतीक बब्बरनं आता त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोघेही लग्नाचे विधी पार पाडताना दिसले.
4/7
मंडपातील एका फोटोमध्ये प्रतीक बब्बर काहीसा भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी त्याची नववधू प्रिया बॅनर्जी त्याला आधार देताना दिसली.
5/7
प्रतीक आणि प्रियानं लग्नात मॅचिंग आऊटफिट्स कॅरी केले होते. अभिनेता ऑफ-व्हाईट शेरवानीमध्ये दिसला. प्रियानंही त्याच रंगाचा लेहेंगा वेअर केलेला.
6/7
लग्नानंतर, प्रतीक आणि प्रिया पापाराझींनाही भेटले. तिथे दोघेही कॅमेऱ्यासमोर लिप-लॉक करताना दिसले.
7/7
याशिवाय, या नवविवाहित जोडप्यानं पापाराझींना त्यांच्या लग्नाची मिठाई देखील वाटली. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावरुन आनंद ओसंडून वाहत होता.
Published at : 15 Feb 2025 07:09 AM (IST)