जरतारी काठ, नऊवारी थाट..., 'मदनमंजिरी'च्या मोहक अदा, प्राजक्ता माळीनं जगप्रसिद्ध फ्रेंच रिव्हेरामध्ये फ्लॉन्ट केला मराठमोळा साज
Cannes Film Festival 2026 Prajakta mali Look: जगप्रसिद्ध असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा माय मराठीचा जागर पाहायला मिळाला.

Cannes Film Festival 2026 Prajakta mali Look
1/13
Cannes Film Festival 2026 Prajakta mali Look: जगप्रसिद्ध असलेल्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा माय मराठीचा जागर पाहायला मिळाला.
2/13
अभिजात मराठीच्या ग्लोबल लाँचच्या निमित्तानं मराठी सेलिब्रिटी अशोक सराफ, निवेदिता सराफ, प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर यांनी कान्स फेस्टिव्हलसाठी हजेरी लावली.
3/13
यंदाच्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये (Cannes Film Festival) मराठी मनोरंजनविश्वाच्या (Marathi Entertainment World) शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेलाय.
4/13
यंदा कान्सच्या रेड कार्पेटवर (Cannes Red Carpet) मराठमोळ्या सेलिब्रिटींनी दिमाखदार एन्ट्री घेतली.
5/13
मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ (Ashok Saraf), अभिनेत्री निवेदिता सराफ (Nivedita Saraf), अभिनेत्री प्राजक्ता माळी (Actress Prajakta Mali), सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर (Ankita Walawalkar) यांनी कान्सच्या रेड कार्पेटवर आपला डेब्यू केला.
6/13
मराठमोळ्या सेलिब्रिटींनी रेड कार्पेटवर आपला खास मराठमोळा अंदाज दाखवला. यामध्ये अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या लूकवर साऱ्यांच्याच नजरा खिळल्यात. प्राजक्तानं तिच्या कान्स डेब्यूचा व्हिडीओ स्वतःच्या इन्स्टा हँडलवरुन शेअर करत त्यासोबत लक्ष वेधून घेणारं कॅप्शनही लिहिलेलं.
7/13
नऊवारी साज, त्यात जरतारी साडी अशा मराठमोळ्या साजात प्राजक्ता कान्सच्या रेड कार्पेटवर मिरवली.
8/13
मराठी रसिकप्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेली प्राजक्ता माळीनं मराठमोळा साज ज्या पद्धतीनं रेड कार्पेटवर फ्लॉन्ट केला, त्यामुळे परदेशी फोटोग्राफर्सच्या नजराही तिच्यावर खिळल्या.
9/13
रेड कार्पेटवर मिरवल्यानंतर प्राजक्ता माळी थेट जगप्रसिद्ध फ्रेंच रिव्हेरा इथे पोहोचली. तिथे समु्द्र किनारी प्राजक्तानं नऊवारी साडीत क्लासी फोटोशूट केलं.
10/13
फ्रान्समधील प्रसिद्ध फ्रेंच रिव्हेरा येथे तिने खास फोटोशूट केलं. तिच्या नऊवारीचा पदर उडवत तिनं मस्त पोज दिल्या.
11/13
नऊवारी साडी, तिचा लांबसडक पदर त्यासोबत केसांचा अंबाडा त्यावर खोपा, पारंपरिक दागिने, गळ्यात हार, सोन्याचे कानातले, नथ, कपाळी चंद्रकोर, हातात बांगड्या आणि पायात पैंजण आणि त्यावर हाय-हिल... असा प्राजक्ता माळीचा लूक सर्वांची नजर खिळवून ठेवत होता.
12/13
फ्रेंच रिव्हेरा इथल्या फोटोशूटचे क्लासी फोटो शेअर करत प्राजक्ता माळीनं एक क्लासी कॅप्शनही लिहिलंय... 'काही लिहायची गरज? फक्त… मिळत असलेल्या सगळ्या प्रेमाबद्दल… खूप प्रेम', असं तिनं कॅप्शनमध्ये लिहिलंय.
13/13
चाहत्यांनी प्राजक्ताच्या या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेकांनी तिला 'जलपरी' असं संबोधलं आहे. समुद्राच्या काठावर तिला निळ्या नऊवारी साडीत बघून चाहते भाळले आहेत.
Published at : 19 May 2026 02:51 PM (IST)