मराठमोळ्या प्राजक्ता माळीची 'कान्स'वारी; ऑफशोल्डर लाल गाऊनमध्ये दिमाखात मिरवली, घायाळ करणारे PHOTOs पाहिलेत?
Prajakta Mali Cannes Film Festival 2026 Red Carpet Look: मराठी प्रेक्षकांसाठी अभिमानाची बाब म्हणजे, सर्वांची लाडकी प्राजक्ता माळी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकली आहे.

Prajakta Mali Cannes Film Festival 2026 Red Carpet Look
1/13
Prajakta Mali Cannes Film Festival 2026 Red Carpet Look: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री प्राजक्ता माळी म्हणजे, लाखो तरुणांच्या दिलाची धडकन.
2/13
प्राजक्ता या ना त्या कारणानं नेहमीच चर्चेत असते. पण, सध्या प्राजक्ता माळी चर्चेत आहे ती, तिनं 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये उपस्थित राहिल्यामुळे.
3/13
सध्या सर्वांच्या नजरा फ्रान्समध्ये सुरू असलेल्या प्रतिष्ठित अशा 79व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलकडे लागलं आहे.
4/13
आजवर कान्सच्या रेड कार्पेटवर अनेक हॉलिवूड आणि बॉलिवूड स्टार्स झळकताना दिसलेत. पण, यंदाचा कान्स फिल्म फेस्टिवल मराठी प्रेक्षकांसाठी खूपच खास आणि त्यासोबतच अभिमानानं मान उंचावणारा ठरलाय.
5/13
यंदा मराठी अभिनेता पुष्कर जोग कान्सच्या रेड कार्पेटवर उतरला आणि त्यापाठोपाठ आता प्राजक्ता माळीसुद्धा कान्सच्या मंचावर दिमाखात मिरवताना दिसली.
6/13
चाहत्यांची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिनं कान्सच्या मंचावर दिमाखात एन्ट्री घेतली. सध्या तिचे कान्समधले फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहेत.
7/13
प्राजक्ताने कान्स फेस्टिव्हलमधील तिचे स्टायलिश फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
8/13
एका बोल्ड लाल रंगाच्या ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये प्राजक्ता माळी कान्समध्ये झळकली आहे. त्यासोबतच मिनिमल मेकअप आणि कॉन्फिडन्स तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहतोय.
9/13
प्राजक्ता माळी हिनं स्वतः इन्स्टाग्राम हँडलवर स्वतःचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यासोबतच तिनं 'Having My Cannes Moments' असं कॅप्शन दिलं आहे.
10/13
जागतिक मंचावर प्राजक्ताचा हा अत्यंत स्टायलिश लूक पाहून तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच, प्राजक्ताचं इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर झळकणं महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे, अशा कमेंट्सही अनेकांनी केल्या आहेत.
11/13
मराठी भाषेला मिळालेल्या 'अभिजात दर्जा'च्या पार्श्वभूमीवर, कान्स फेस्टिव्हलमध्ये 'भारत पॅव्हेलियन' अंतर्गत एका विशेष सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
12/13
या जागतिक मंचावर 'अभिजात मराठी'चं ग्लोबल लाँचिंग करण्यासाठी प्राजक्ता माळी तिथे अधिकृत प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिली आहे.
13/13
प्राजक्ता माळीसोबतच कान्समध्ये मराठीतले दिग्गज अभिनेते अशोक सराफ, अभिनेत्री निवेदिता सराफ आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकरसुद्धा आहे.
Published at : 18 May 2026 09:22 AM (IST)