मोठ्या दुर्घटनेतून मुलगा सुखरुप परतला, पवन कल्याण यांच्या रशियन पत्नीने तिरुपती मंदिरात जाऊन नवस पूर्ण केला
Pawan Kalyan wife anna konidela : दक्षिणेतील सुपरस्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या रशियन पत्नीने त्यांच्या 8 वर्षांच्या मुलाच्या सुखरूप परतीसाठी प्रार्थना केली होती.

Pawan Kalyan
1/9
Pawan Kalyan wife anna konidela : आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचे पुत्र आणि अभिनेते मार्क शंकर पवानोविच हे गेल्या आठवड्यात सिंगापूरमधील एका शाळेला लागलेल्या आगीत जखमी झाले होते.
2/9
दरम्यान, आता अभिनेता आणि त्याचा मुलगा आता भारतात परतले आहेत. anna konidela यांचा मुलगा बरा झाल्यानंतर तो भारतात परत आलय. परत आल्यानंतर अभिनेत्याची पत्नी anna konidela यांनी तिरुपती मंदिरात 'मुंडन' विधी केला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
3/9
मुलांना जर थोडासा ओरखडा पडला तरी आईचे हृदय पिळवटून जाते. कोणतीही आई मुलांच्या सुरक्षिततेसाठी काहीही करण्यास तयार असते. सुपरस्टार पवन कल्याणच्या रशियन पत्नीनेही तिचा लाडका बरा झाल्यानंतर असे काही केले की सर्वजण तिचे कौतुक करत आहेत.
4/9
खरंतर पवन कल्याण आणि anna konidela चा मुलगा मार्क शंकर 8 एप्रिल रोजी सिंगापूरमधील एका उन्हाळी शिबिरात गेला होता. पण दुर्दैवाने, तिथे आग लागली आणि या हृदयद्रावक घटनेत, सुपरस्टारच्या मुलाचे हात आणि पाय जळाले. मात्र, आता मार्क पूर्णपणे ठीक आहे. आगीत जळालेल्या आठ वर्षांच्या मुलाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याच्या आनंदात पवन कल्याण यांच्या पत्नीने मुंडन केले आहे.
5/9
जनसेना पार्टीने त्यांच्या x अकाउंटवर पवन कल्याणच्या पत्नीने तिरुमला मंदिरात मुंडन केल्याचे फोटो देखील शेअर केले आहेत.
6/9
या फोटोंमध्ये, पवन कल्याण यांची पत्नी तिचे डोके पूर्णपणे मुंडताना दिसत आहेत.
7/9
हे फोटो शेअर करताना जनसेवा पक्षाने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "परंपरा लक्षात ठेवून anna konidela यांनी तिरुपती मंदिरात 'मुंडन' विधी केला"
8/9
या फोटोंमध्ये पवन कल्याणची पत्नी अण्णा हात जोडून दिसत आहे.
9/9
हे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि चाहते त्यांच्या या कृतीचे कौतुक करत आहेत.
Published at : 14 Apr 2025 05:05 PM (IST)