मार्चमध्ये Entertainmentचा तडका! एकाचढ एक सिनेमांची मेजवानी, कोणता सिनेमा पाहाल?
Top OTT Releases This Week March Month: 9 ते 15 मार्च दरम्यान अनेक नवीन चित्रपट आणि वेब सिरीज ओटीटीवर रिलीज होणार आहेत.

OTT releases this week
1/9
मार्च महिना हा निश्चितच मनोरंजनाचा महिना ठरणार आहे. कारण या महिन्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार चित्रपट आणि वेब सिरीज रिलीज होणार आहे. विविध जॉनरमधील कंटेट आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. 9 ते 15 मार्च या कालावधीत ओटीटी प्लॅटफॉर्मवर कोणते चित्रपट आणि वेब सिरिज प्रदर्शित होणार? याची यादी पाहूयात.
2/9
अमरीश गोयल दिग्दर्शित द ताज स्टोरीची प्रचंड चर्चा झाली. परेश रावल व्यतिरिक्त या चित्रपटात झाकीर हुसेन, अमृता खानविलकर, नमित दास आणि स्नेहा वाघ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहता येईल. हा चित्रपट लायंसगेट प्लेवर पाहता येईल.
3/9
अॅस्पिरंट्स सीझन 3 हा आयएएस अधिकारी अभिलाष यांच्या प्रवासावर आधारित आहे. ज्यांना नवीन प्रशासकीय आव्हाने आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या पार पाडावे लागतात. दीपेश सुमित्रा जगदीश दिग्दर्शित या नवीन सिझनमध्ये, नवीन कास्ट मेंबर, नवीन कस्तुरिया, सनी हिंदुजा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही वेब सिरीज 13 मार्च रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.
4/9
अंधा प्यार 2.0 हा एक आगळावेगळा रिअॅलिटी शो आहे. कॉमेडियन विवेक समतानी आणि कौस्तुभ अग्रवाल हे या शोचे क्रिएटर आणि होस्ट आहेत. हा शो 14 मार्चपासून ओटीटी प्लॅटफॉर्म झी5वर स्ट्रीम केला जाणार आहे.
5/9
भरथा महासयुलाकु विग्न्याप्ति हा एक तेलुगु कॉमेडी ड्रामा फिल्म आहे. किशोर तिरुमाला दिग्दर्शित या चित्रपटात रवि तेजा, आशिका रंगनाथ आणि डिंपल हयाती यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 13 मार्च रोजी झी 5वर पाहता येईल.
6/9
प्रियांका मोहन अभिनीत मेड इन कोरिया या तामिळ ड्रामा चित्रपटाची प्रचंड चर्चा आहे. हा चित्रपट आपल्याला 12 मार्चपासून नेटफ्लिक्सवर पाहता येईल.
7/9
व्हर्जिन रिव्हर सीझन 7 हा एक कल्ट क्लासिक रोमँटिक शो आहे. ही वेब सिरीज आपल्याला नेटफ्लिक्सवर 12 मार्चपासून पाहता येईल.
8/9
मेड फॉर इच अदर हा एक रिअॅलिटी शो आहे. हा कपल शो 15 मार्च रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. या शोमध्ये 10 सेलिब्रिटी जोडपे सहभाग घेतील.
9/9
केवी अनुदीप दिग्दर्शित फंकी हा तेलुगु कॉमेडी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा चित्रपट 13 मार्च रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
Published at : 10 Mar 2026 12:04 PM (IST)