Nita Ambani Royal Look: जॉर्जेट साडी अन् डायमंड ज्वेलरी; नीता अंबानींची 'रॉयल स्टाईल', हातातल्या हिऱ्यांच्या घडळ्यानं लुटली सारी लाईमलाईट PHOTOs
Nita Ambani Royal Look: मुकेश अंबानींच्या पत्नी नीता अंबानी वयाच्या 60 व्या वर्षीही आपल्या स्टाईलनं सर्वांना थक्क करतात. त्यांचा लूक, उत्साह पाहून त्या या वयातील आहेत, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.

Nita Ambani Royal Look
1/10
Nita Ambani Royal Look: मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी वयाच्या 60 व्या वर्षीही आपल्या स्टाईलनं सर्वांना थक्क करतात. त्यांचा लूक आणि उत्साह पाहून त्या या वयातील आहेत, यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.
2/10
नीता अंबानी जेव्हा जेव्हा एखाद्या कार्यक्रमात हजेरी लावतात, तेव्हा त्या संपूर्ण लाइमलाइट आपल्याकडे खेचून घेतात. नुकतेच त्यांनी पुन्हा एकदा अशाच एका जबरदस्त लूकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
3/10
नीता अंबानी यांनी नुकतीच प्रसिद्ध डिझायनर 'अबू जानी संदीप खोसला' यांनी डिझाइन केलेली एक सुंदर जॉर्जेट साडी नेसली होती.
4/10
या ऑफ-व्हाइट रंगाच्या साडीवर अतिशय नाजूक एम्ब्रॉयडरी करण्यात आली असून, यामध्ये त्या एखाद्या राणीप्रमाणे दिसत होत्या.
5/10
या साडीसोबत त्यांनी हेवी वर्क असलेला ब्लाउज घातला होता. एका कौटुंबिक लग्नासाठी त्यांनी या खास पेहरावाची निवड केली होती. त्यांच्या या लूकला हिऱ्यांच्या दागिन्यांनी अधिकच खास बनवलेलं.
6/10
हिऱ्यांचा नेकलेस, कानातले आणि ब्रेसलेट यांच्या चकाकीसमोर नीता अंबानींच्या चेहऱ्याचं तेजही फिकं पडत होतं.
7/10
आपल्या या लूकसाठी नीता अंबानी यांनी मिनिमल मेकअपची निवड केली होती. स्मोकी आइज आणि लाईट पिंक लिपस्टिकसह कपाळावरील टिकलीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं.
8/10
अंबानी कुटुंबाच्या ज्वेलरी कलेक्शनमध्ये हिऱ्यांपासून ते पाचूपर्यंत (Emeralds) अनेक मौल्यवान दागिने आहेत. याचीच झलक या लूक मध्येही पाहायला मिळाली.
9/10
नीता अंबानी यांनी या साडीसोबत त्यांच्या वैयक्तिक कलेक्शनमधील हिऱ्यांचं घड्याळ (Diamond Watch) वेअर केलं होतं. य घड्याळानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं.
10/10
नीता अंबानी अनेकदा अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या ट्रेडिशनल कलेक्शनला पसंती देतात. या डिझायनर जोडीनं केवळ नीता अंबानींसाठीच नाही, तर अंबानी कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी कपडे डिझाइन केले आहेत. अंबानींच्या तिन्ही मुलांच्या लग्नातही याच डिझायनर जोडीनं कपडे डिझाइन केले होते.
Published at : 26 Mar 2026 08:39 AM (IST)