In Pics | मुलीच्या जन्मानंतर दोन महिन्यांतच अनुष्काचा मोठा निर्णय
बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, हीनं कायमच तिच्या जीवनातील विविध निर्णय आणि प्रसंगांतून इतरांना प्रोत्साहित केलं आहे. अनेकदा तिनं इतरांपुढे आदर्शही प्रस्थापित केला आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकाही दिवसांपूर्वीच अनुष्कानं एका मुलीला जन्म दिला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या जीवनात एका चिमुकलीचं आगमन झालं आणि या दोघांच्या जीवनातही एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली.
आता मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर अनुष्कानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचा. (छाया सौजन्य- मानव मंगलानी)
बुधवारीच अनुष्काला एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान पाहिलं गेलं. जिथं तिचा अंदाज आणि स्टाईल स्टेटमेंट पाहण्याजोगी होती. (छाया सौजन्य- मानव मंगलानी)
अनुष्कानं मुलीच्या जन्मानंतर लगेचच तिच्या कारकिर्दीवरही लक्ष देण्यास सुरुवात केली.
शारीरिक सुदृढतेकडे लक्ष देण्यासोबतच अनुष्कानं तिच्या मुलीच्या संगोपनालाही तितकं प्राधान्य दिलं आहे.
सोशल मीडियावर ती वामिकासोबतचे काही फोटोही शेअर करताना दिसते.