बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा, हीनं कायमच तिच्या जीवनातील विविध निर्णय आणि प्रसंगांतून इतरांना प्रोत्साहित केलं आहे. अनेकदा तिनं इतरांपुढे आदर्शही प्रस्थापित केला आहे.
2/7
काही दिवसांपूर्वीच अनुष्कानं एका मुलीला जन्म दिला. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या जीवनात एका चिमुकलीचं आगमन झालं आणि या दोघांच्या जीवनातही एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली.
3/7
आता मुलीच्या जन्मानंतर अवघ्या दोन महिन्यांनंतर अनुष्कानं अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे पुन्हा एकदा कामावर रुजू होण्याचा. (छाया सौजन्य- मानव मंगलानी)
4/7
बुधवारीच अनुष्काला एका जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान पाहिलं गेलं. जिथं तिचा अंदाज आणि स्टाईल स्टेटमेंट पाहण्याजोगी होती. (छाया सौजन्य- मानव मंगलानी)
5/7
अनुष्कानं मुलीच्या जन्मानंतर लगेचच तिच्या कारकिर्दीवरही लक्ष देण्यास सुरुवात केली.
6/7
शारीरिक सुदृढतेकडे लक्ष देण्यासोबतच अनुष्कानं तिच्या मुलीच्या संगोपनालाही तितकं प्राधान्य दिलं आहे.
7/7
सोशल मीडियावर ती वामिकासोबतचे काही फोटोही शेअर करताना दिसते.