Splitsvilla फेम अभिनेत्याचं निधन, सनी लिओनी ढसाढसा रडली, नेमकं घडलं तरी काय?
Fitness Model Mayank Pawar Dies After Liver Illness: मयंक पवारसाठी सनी लिओनी भर कार्यक्रमात रडली होती.

Mayank Pawar Splitsvilla 7 contestant death reason
1/8
Mayank Pawar Splitsvilla 7 contestant death reason: स्पि्लट्सविला सिझन 7 मधून चाहत्यांचं मन जिंकणारा कलाकार मयंक पवार आज आपल्यात नाही. वयाच्या 37 व्या वर्षी त्यानं अखेरचा श्वास घेतला. त्याला लिव्हरच्या आजाराने ग्रासलं होतं.
2/8
त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून नेटकऱ्यांना प्रचंड धक्का बसला. मयंकच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करुन त्याच्या निधनाची माहिती देण्यात आली.
3/8
मयंक हा फिटनेस फ्रिक होता. पिळदार शरीर आणि शांत स्वभावावर अनेक जण फिदा होते. त्याचं निधन नेमकं कसं झालं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टवर अनेकांनी श्रद्धांजली वाहिली.
4/8
मयंक पवारला स्पि्लट्सविलामुळे खरी ओळख मिळाली होती. स्पि्लट्सविलाचा सातवा सिझन प्रचंड गाजला. यामध्ये प्रत्येक स्पर्धकांमध्ये भांडणं पाहायला मिळत होतं. मात्र, मयंक शांतपणे आपला खेळ खेळायचा.
5/8
त्यानं या शोमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मात्र, त्याला शोमधून एक्झिट घ्यावी लागली. त्याची शोमधून एक्झिट होताच अनेक जण भावुक झाले.
6/8
मयंकला निरोप देताना अनेक जण भावुक झाले होते. सनी लिओनी देखील भावुक झाली होती. ती आपले अश्रू रोखू शकली नाही.
7/8
स्पि्लट्सविला या शोचे होस्ट निखिल चिनप्पा आणि सनी लिओनीने मयंक पवारला मिठी मारली, तसेच भावुक होत निरोप दिला होता.
8/8
मयंक पवारने आपल्या कारकिर्दीत मिस्टर इंडिया हा किताब तब्बल सात वेळा पटकावला. तो फिटनेससाठी कायम चर्चेत राहत होता. तो सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर देखील होता. त्यानं आतापर्यंत अनेक खेळाडूंना घडवले आहे. त्यानं शाहरुख खानसोबतही काम केले होते. हॅपी न्यू इअरच्या शूटिंगदरम्यान, त्यानं बॉडीगार्ड म्हणून जबाबदारी सांभाळली होती.
Published at : 25 Feb 2026 06:25 PM (IST)