In Pics | Ranbir Kapoor पासून सोनू सूदपर्यंत, बी टाऊन सेलिब्रिटींकडे आहेत 'या' आलिशान कार
युवा पिढीच्या काळजाचा ठोका असणाऱ्या अभिनेता टायगर श्रॉफ याच्याकडे एक बीएमडब्ल्यू 5 सीरीज ही कार आहे. या कारची किंमत 49 लाख रुपयांच्या घरात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appलॉकडाऊनच्या काळात अनेक स्थलांतरित मजुरांची मदत करणाऱ्या अभिनेता सोनू सूद याच्याकडे Audi Q7 ही कार आहे. या कारची किंमत 60 ते 80 लाख रुपये इतकी आहे. याशिवाय त्याच्याकडे Mercedes-Benz ही कारही आहे.या कारची किंमत 50 ते 60 लाख रुपये इतकी आहे. तो Porsche Panamera या कारचाही मालक आहे. या कारची किंमत 1.8 कोटी ते 2 कोटी रुपये इतकी आहे.
अभिनेत्री कियारा अडवाणी हिच्याकडे Mercedes-Benz E-Class E220D ही कार आहे. या कारची किंमत 57.17 लाख रुपये इतकी आहे.
2017 मध्ये अभिनेता रणबीर कपूर यानं Land Rover Range Rover Vogue ही कार खरेदी केली होती. त्यावेळी या कारची किंमत 1.6 कोटी रुपये इतकी होती. रणबीरकडे Audi R8 आणि Audi A8 L या कारही आहेत.
बॉलिवूडचा खिलाडी कुमार, अभिनेता अक्षय कुमार याच्याकडे 1.37 कोटी रुपयांची Porsche Cayenne आणि Mercedes-Benz V-Class ही कार आहे. याशिवाय त्याच्याकडे Rolls-Royce Phantom ही 9.50 कोटी रुपयांची कारही आहे.