Actress Madalsa Sharma: 'बिकीनी घालून तुझी बॉडी दाखव...', दिग्दर्शकाची घाणेरडी मागणी, मिथुन चक्रवर्तींच्या सुनेला आलेला हादरवणारा अनुभव
Actress Madalsa Sharma on casting couch experience: मदालसा शर्माने कास्टिंग काऊचबाबत धक्कादायक अनुभव शेअर केला.
Continues below advertisement

Madalsa Sharma Casting Couch
Continues below advertisement
1/9
Madalsa Sharma Casting Couch: चमचमत्या सिनेइंडस्ट्रीत बऱ्याचदा लोकांचं काळं कृत्यही दडलेलं असतं. जे कलाकारांच्या विधानातून अनेकदा उघड होतं. असाच एक धक्कादायक खुलासा 'अनुपमा' फेम अॅक्ट्रेस मदालसा शर्माने केला.
2/9
Hutterflyच्या पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या अश्लील मागणीबाबत माहिती दिली. 'मीटिंगला बोलावलं आणि बिकीनी घालायला सांगितलं', अशी माहिती अभिनेत्रीने दिली.
3/9
मदालसा म्हणते, 'प्रसिद्ध दिग्दर्शकाने मला मीटिंगला बोलावलं होतं. मी तेव्हा साधारण 19 वर्षांची असेन. त्याने मला सांगितलं की, मी अशी एक मुलगी शोधत आहे, जी बिकीनीमध्ये कंफर्टेबल असेल'.
4/9
'मी तेव्हा ठीक असं म्हटलं. पण मला पहिले चित्रपटाची स्टोरी ऐकायची होती. या सिनेमाचा अँगल काय आहे? हे जाणून घ्यायचं होतं. मी जरी 19 वर्षांची असली तरी, मी स्मार्ट होती', असं अभिनेत्री म्हणाली.
5/9
मदालसा म्हणाली की, 'दिग्दर्शकाला हे पाहायचं होतं की, मी बिकीनी घालू शकते का, त्याला माझी बॉडी लॅग्वेंज पाहायची होती. कॅमेरासमोर मी कंफर्टेबल असणार की नाही, हे त्याला जाणून घ्यायचं होतं'.
Continues below advertisement
6/9
दरम्यान, मदालसाने दिग्दर्शकाला नकार दिला, ती म्हणाली, 'सॉरी, मी एक प्रोफेशनल अॅक्टर आहे. जर सिनेमात बिकीनी, साडी किंवा लेहेंगा घालण्याची आवश्कयता असेल, तर मी कॅमेऱ्यासमोर घालेन, कंफर्टेबल असेन. कारण हा माझा कामाचा एक भाग आहे', असं अभिनेत्री म्हणाली.
7/9
'तुझ्यासमोर बिकीनी घालणं हा माझ्या कामाचा भाग नाही. माझ्या टॅलेंटवर विश्वास ठेवून मला कास्ट करत असाल तर, करा. नाहीतर मला बाहेरचा रस्ता माहित आहे', असंही अभिनेत्री म्हणाली.
8/9
यानंतर मदालसा तेथून निघून गेली होती. 'दिग्दर्शक नेमकं काय विचार करत असेल, याचा मी विचार केलेला नाही. काही दिवसानंतर मला कळालं की, ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीसोबत त्याचे अफेअर सुरू होतं, अशी माहितीही अभिनेत्रीने मुलाखतीत दिली.
9/9
अभिनेत्रीला 'अनुपमा' सिरियलमधील काव्याच्या भूमिकेमुळे विशेष ओळख मिळाली. 2018 साली मदालसाने मिथुन चक्रवर्तीच्या मुलासोबत लग्न केलं. आज दोघेही सुखी संसार करत आहेत.
Published at : 01 May 2026 12:57 PM (IST)