Mirzapur The Movie Actor Mohit Malik: 'बीना भाभी'सोबत इंटीमेट सीन, 'कालीन भैया'वरही पडलाय भारी; 'मिर्जापुर द मूवी'मध्ये धुरळा उडवणाऱ्या 'या' तडफदार अभिनेत्याला ओळखलं?
Mirzapur The Movie Actor Mohit Malik: मिर्झापूरच्या सत्तेच्या खुर्चीसाठीची लढाई आता मोठ्या पडद्यावर पोहोचली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या मिर्झापूर: द मुव्ही सध्या धुमाकूळ घालतोय.
Continues below advertisement

Mirzapur The Movie Actor Mohit Malik
Continues below advertisement
1/8
Mirzapur The Movie Actor Mohit Malik: मिर्झापूरच्या सत्तेच्या खुर्चीसाठीची लढाई आता मोठ्या पडद्यावर पोहोचली आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'मिर्झापूर: द मुव्ही'मध्ये प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली जुनी पात्रं तर आहेतच, पण त्यासोबतच काही नव्या पात्रांचीही यात एन्ट्री झाली आहे.
2/8
यात मोहित मलिकनं साकारलेलं 'बिरजू लोहार' हे पात्र विशेष लक्षवेधी ठरतंय, त्यानं संपूर्ण सिनेमात धुमाकूळ घातलाय.
3/8
या सिनेमात बिरजू लोहार आणि बीना भाभी यांच्यात भूतकाळातील काही गोष्टी समोर येतात. अभिनेत्री रसिका दुग्गल (जिनं बीना भाभीची भूमिका साकारलीय) हिच्यासोबतच्या सिनेमातल्या त्याच्या काही इंटीमेट सीन्सची चर्चा रंगलीय.
4/8
मोहित मलिक हा एक लोकप्रिय टेलिव्हिजन अभिनेता असून त्यानं अनेक सीरिअल्समध्ये महत्त्वाची भूमिका साकारलीय. गेल्या काही दिवसांपासून तो लाईमलाईटमध्ये आलाय.
5/8
अनेक वर्षे सीरिअल्समध्ये काम केल्यानंतर, 2013 मधील 'डोली अरमानों की' (Doli Armaanon Ki) सीरिअलनं त्याला प्रसिद्धी मिळवून दिली. प्रेक्षकांनी या सीरिअलला खूप पसंती दर्शवलेली. तसेच, 'झलक दिखला जा' (Jhalak Dikhhla Jaa) या डान्स रिअॅलिटी शोमध्ये त्यानं तिसरं स्थान पटकावलेलं.
Continues below advertisement
6/8
मोहितनं स्टार प्लसवरील 'कुल्फी कुमार बाजेवाला' (Kulfi Kumar Bajewala) या मालिकेत मुख्य भूमिका साकारलेली. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळालाय आणि त्यामुळे तो घराघरांत पोहोचलाय. त्यानंतर, टेलिव्हिजनच्या पलीकडे जाऊन त्यानं सिनेमांमध्येही आपलं नशीब आजमावलंय.
7/8
2025 मध्ये, तो राशा थडानीच्या 'आझाद' (Azaad) सिनेमात झळकला. आता तो 'मिर्झापूर: द मूव्ही'मध्ये (Mirzapur: The Movie) दिसतोय. विशेष म्हणजे, या सिनेमात तो सोशल मीडिया स्टार रवी किशनसोबत स्क्रीन शेअर करत असून, त्यानं आपली प्रभावी छाप पाडण्याची संधीही साधली आहे.
8/8
'मिर्झापूर: द मूव्ही'चं दिग्दर्शन गुरमीत सिंह यांनी केलंय (ज्यांनी मूळ वेब सीरिजचेही दिग्दर्शन केलेलं), तर फरहान अख्तर सिनेमाचे निर्माते आहेत.
Published at : 05 Sep 2026 02:58 PM (IST)