लग्नानंतर पहिली परदेशवारी! थायलंड बीचवरील अभिनेत्रीचा बोल्ड लूक पाहून चाहत्यांची धडधड वाढली!
थायलंडच्या माया बे समुद्रकिनाऱ्यावर अनुष्काने आपल्या खास लुकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.

Marathi Actors Honeymoon Trip
1/9
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता मेघन जाधव व अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर 16 नोव्हेंबर रोजी लग्नबंधनात अडकले.
2/9
मेघन आणि अनुष्का दोघेही सोशल मीडियावर कायम ऍक्टिव्ह असतात. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक अपडेट ते शेअर करताना दिसतात.
3/9
लग्नानंतर जवळपास दोन-तीन महिन्यांनी दोघेही पुन्हा चर्चेत आले आहेत ते त्यांच्या Vacation मुळे .
4/9
मराठी मनोरंजन सृष्टीतील ही लोकप्रिय जोडी सध्या थायलंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
5/9
थायलंडच्या माया बे समुद्रकिनाऱ्यावर अनुष्काने आपल्या खास लुकमध्ये फोटो पोस्ट केले आहेत.
6/9
ती आणि मेघन दोघेही अतिशय रिलॅक्स मूडमध्ये दिसतायत. त्यांच्या या हनिमून ट्रीपची सध्याच्या चाहत्यांमध्ये मोठी चर्चा आहे.
7/9
लग्नानंतरचा त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. दोघांनी हे थायलंडच्या समुद्रकिनाऱ्यावर एकमेकांसोबत वेळ घालवल्याचं त्यांच्या पोस्टमधून दिसतंय.
8/9
अनुष्का व मेघन यांची भेट ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या निमित्ताने झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि वर्षभराने मेघनने त्यांच्या नात्याविषयी घरी सांगितलं होतं.
9/9
मेघन व अनुष्का गेली अडीच वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी सोशल मीडियावर प्रेमाची जाहीर कबुली दिलेली. नोव्हेंबरमध्ये दोघांनीही लग्न केलं आहे.
Published at : 04 Mar 2026 01:19 PM (IST)