कुंभमेळ्यातल्या मोनालिसाचं नव्यानं नशीब पालटलं, क्षणात झाली लखपती, मिळाली 'ही' मोठी ऑफर!
Viral Girl Monalisa : कुंभमेळ्यात व्हायरल झालेली मोनालिसा ही तरुणी चांगलीच चर्चेत आली होती. आता ही तरुणी चक्क लखपती झाली आहे.

kumbh mela 2025 monalisa went viral
1/7
Kumbhmela 2025 Viral Girl Monalisa : कुंभमेळ्यात माळा विकणारी मोनालिसा तिच्या सौंदर्यामुळे व्हायरल झाली.माळा विकत असताना कोणीतरी तिचा फोटो काढून इंटरनेटवर अपलोड केला होता.
2/7
तिच्या सुंदर डोळ्यांमुळे ती अगदी कमी काळात सोशल मीडियावर व्हायरल झाली. पुढे-पुढे तर तिला कुंभमेळ्यात माळा विकणेदेखील कठीण होऊन बसले. सर्वजण तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी आतुर होते. त्यामुळेच तिला कुंभमेळ्याच्या बाहेर पडावे लागले.
3/7
इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर तिला एक चित्रपटही मिळाला आहे. या चित्रपटाचे 12 फेब्रुवारी रोजी शूटिंग चालू होणार होते.
4/7
इंडिया गेटवर हे शूटिंग होणार होते. मात्र परवानगी न मिळाल्यामुळे हे शूटिंग होऊ शकले नाही.
5/7
दरम्यान, आता मोनालिसाचे नशीब नव्याने उजळले आहे. तिच्याशी एका ज्वेलरी ब्रँडने संपर्क साधला आहे. या ज्वेलरी ब्रँडच्या दागिन्यांचे प्रमोशन करण्यासाठी तिला तब्बल 15 लाख रुपये मिळणार आहेत.
6/7
याच कराराअंतर्गत ती 14 फेब्रुवारी रोजी केरळमध्येही जाणार आहे. तेथे ती एका कार्यक्रमात सहभागी होणार आहे. दुसरीकडे तिच्या आगामी चित्रपटाचे नाव डयरी ऑफ मणिपूर असे आहे.
7/7
या चित्रपटात ती प्रमुख नायिका असणार आहे. या चिपटासाठी तिला 21 लाख रुपये फी म्हणून देण्यात आले आहेत.
Published at : 11 Feb 2025 10:05 PM (IST)