Madhuri Dixit Education: सिनेमासाठी शिक्षण सोडलं, 12वीनंतर पहिल्या चित्रपटाची ऑफर; 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षित किती शिकलीये?
Madhuri Dixit Education: अबोध सिनेमानंतर माधुरी दीक्षितचं आयुष्य बदललं. अभिनेत्रीचं शिक्षण किती?
Continues below advertisement

Madhuri Dixit Education
Continues below advertisement
1/9
माधुरी दीक्षितला आज विशेष परिचयाची गरज नाही. तिनं नृत्य आणि अभिनयाच्या जोरावर सातासमुद्रापार नाव गाजवलं आहे. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रीने विशेष स्थान निर्माण केलं आहे.
2/9
आजही माधुरी दीक्षित अनेक चाहत्यांची क्रश आहे. तिन कोट्यवधी लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अभिनेत्री बऱ्याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिली आहे. पण तुम्हाला माधुरी किती शिकली आहे? माहितीये का?
3/9
अभिनेत्री माधुरी दीक्षितने आपलं शिक्षण मुंबई स्थित डिवाइन चाइल्ड हाय स्कूलमधून पूर्ण केलं. तिनं साठ्ये कॉलेजमधून बीएससी मायक्रोबायोलॉजीमध्ये अॅडमिशन घेतलं होतं. खरंतर अभिनेत्रीनं बीएससीच्या पहिल्याच वर्षात शिक्षण सोडून दिले होते.
4/9
न्यूज 24 ला दिलेल्या मुलाखतीत माधुरीने खुलासा केला होता की, तिनं बीएससीच्या फर्स्ट इअरमध्ये आपलं शिक्षण सोडून दिलं होतं. तर, 12वीनंतर माधुरीला 'अबोध' हा पहिला सिनेमा ऑफर करण्यात आला होता.
5/9
शिक्षण सोडण्यापूर्वी अभिनेत्री प्रचंड कन्फ्यूज होती. 'अबोध' या सिनेमात काम केल्यानंतर तिनं या सिनेसृष्टीत काम करण्याचा निर्णय घेतला.
Continues below advertisement
6/9
माधुरीने सांगितलं की, तिला कधीच अभिनेत्री व्हायचं नव्हतं. 'तेजाब' सिनेमामुळे तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. 'एक- दोन - तीन' या गाण्यामुळे तिला विशेष ओळख मिळाली.
7/9
यानंतर अभिनेत्रीने कधी मागे वळून पाहिलं नाही. तिनं आपल्या कारकिर्दीत 'राम लखन', 'त्रिदेव', 'बेटा' यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली आहे.
8/9
केवळ सिनेमात नाही तर, अभिनेत्रीने ओटीटी विश्वातही काम केलं. अलिकडेच अभिनेत्रीचा 'मां बहन' ही वेब सिरीज रिलीज झाली होती. या सिरीजची प्रचंड चर्चा झाली.
9/9
image 10
Published at : 22 Jun 2026 05:42 PM (IST)